कौमार्य चाचणीविरोधात जनजागृतीचं काम करणाऱ्यांना मारहाण
कंजारभाट समाजातल्या कौमार्य चाचणीविरोधात जनजागृतीचं काम करणा-यांना मारहाण करण्यात आलीय.
पिंपरी चिंचवड : आता बातमी अनिष्ट रुढी परंपरांच्या वादाची.....कंजारभाट समाजातल्या कौमार्य चाचणीविरोधात जनजागृतीचं काम करणा-यांना मारहाण करण्यात आलीय.
सोशल मीडियावरुन जनजागृतीचाही राग
पिंपरी चिंचवडमधले प्रशांत इन्द्रेकर आणि त्यांचे साथीदार कौमार्य चाचणीविरोधात सोशल मीडियावरुन जनजागृती करतात. त्याचा राग मनात ठेवून समाजातल्या काही गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केलीय.
काही तरुणांनी त्यांना मारहाण केली
प्रशांत इंद्रेकर त्यांच्याच समाजातल्या एका लग्नाला गेले असता त्याठिकाणी काही तरुणांनी त्यांना मारहाण केली. समाजाच्या रूढी परंपरांना विरोध का करता, असा सवाल करत त्यांना मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी 3 जणांना अटक
पिंपरी पोलीस स्थानकात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 जणांना अटक करण्यात आलीय...यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.