`पवारांची बाबरी मशिदीसाठी ट्रस्टची मागणी समाजात तेढ निर्माण करणारी`
शरद पवारांच्या वक्तव्यावर टीका
पिंपरी-चिंचवड : शरद पवार यांनी मशिदीसाठी न्यासाची स्थापना करण्याची केलेली मागणी म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका विश्व हिंदू परिषदेने केली आहे. एवढ्या जबाबदार नेत्याने असे बेजबाबदार वक्तव्य करणे चुकीचे असल्याचं विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांड यांनी म्हंटलं आहे. एमआयएमच्या वारिस पठाण यांनी अशा धमक्या देऊ नयेत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. सीएएच्या समर्थनासाठी विश्व हिंदू परिषद देशभर प्रचार करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मशिदीसाठी ट्रस्टची स्थापना का करण्यात आली नाही? असा सवाल केला आहे. सरकारने अयोध्येत मशीद बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, असं देखील पवारांनी म्हटलं आहे.
पक्षाच्या राज्य संमेलनात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकार राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना करू शकते. तर अजून मशिदीसाठी ट्रस्टची स्थापना करुन निधी का देऊ शकत नाही. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.