Walmik Karad Special-26: वाल्मिक कराडला VIP ट्रिटमेंट दिल्याचा आरोप पोलिसांवर होत असतानाचा तृप्ती देसाईंनी बीड पोलिसांवर नवा बॉम्ब टाकलाय. बीड जिल्हा पोलिसात वाल्मिकच्या मर्जीतले अनेक जण असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. नुसत्या आरोपावर न थांबता देसाईंनी पोलिसांची यादीच सोशल मीडियावर शेअर केलीय. वाल्मिकचे हे 'स्पेशल-26 कोण आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतोष देशमुख प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट दिल्याचा आरोप पोलिसांवर सातत्यानं होत आलाय. बीड पोलीस ठाण्यात नेण्यात आलेल्या बेड पासून ते वाल्मिकच्या हातात बेड्या न टाकता कोर्टात हजर करण्यापर्यंत अनेक बाबतीत पोलिसांवर टीका होतेय. अशातच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी आणखी एका आरोपांचा तोफगोळा डागलाय. वाल्मिक कराडचे सहानुभूतीदार असलेले 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बीडमधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केलाय. 


वाल्मिकचे 'स्पेशल 26' सहानुभूतीदार?


बाळराजे दराडे, बीड ग्रामीण रंगनाथ जगताप , अंबेजोगाई ग्रामीण भागवत शेलार, केज संजय राठोड, अंबेजोगाई त्रिंबक चोपने, केज कागने सतीश, अंबेजोगाई सचिन  सानप, परळी राजाभाऊ ओताडे, बीड बांगर बाबासाहेब, केज विष्णू फड, परळी शहर,प्रवीण बांगर, गेवराई अमोल गायकवाड, युसूफवडगाव राजकुमार मुंडे, अंबेजोगाई शेख जमीर, धारूर रवी केंद्रे, अंबेजोगाई,बापू राऊत, अंबेजोगाई भास्कर केंद्रे, परळी दिलीप गित्ते , केज गोविंद भताने , परळी विलास खरात, वडवणी बाला डाकने, नेकनूर घुगे, पिंपळनेर बनसोड, केज दहिफळे, शिरसाळा चोवले, बर्दापूर डापकर, केजअशी लांबलचक यादी तृप्ती देसाईंनी दिलीये.बीड जिल्ह्यात वाल्मिकचे 26 नव्हे तर 266 सहानुभूतीदार पोलीस असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय.


जोपर्यंत बीड जिल्ह्यांत हे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत तोपर्यंत संतोष देशमुख हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणाचा तपास व्यवस्थित होणार नाही असं तृप्ती देसाईंना वाटतं. त्यामुळं वाल्मिकशी संबंधित सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करण्याची मागणी देसाईंनी केलीय.


याआधीच वाल्मिकशी ज्यांचा संबंध होता अशा अनेकांच्या बदल्या करण्यात आल्या. तरीही  बीड पोलीस दलात वाल्मिकचे 26 सहानुभूतीदार असल्याचा आरोप होतोय. वाल्मिकला सहानुभूती असलेले बीड पोलीस दलात आणखी किती छुपे सहानुभूतीदार आहेत असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय.