गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम: वडील गेल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी घरातील मुलगा देतो अशी आपल्याकडे परंपरा आहे. मात्र हाच पायंडा मोडत मुलींनी आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार केले आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत आपल्या लाडक्या पित्याला 12 मुलींनी खांदा देवून भरलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रामीण भागात शिक्षणाची पाळेमुळे रुजविणारे दानशूर सखाराम गणपतराव काळे यांचे वृध्दापकाळाने वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. अंत्यसंस्काराला मुलगा नसल्याची कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या मुलींनी जाणवू दिली नाही. 12 मुलींनी सगळे विधी अगदी योग्य पद्धतीनं आणि परंपरेनुसार पार पाडले. इतकंच नाही तर 12 मुलींनी वडिलांना खांदा देत अंत्ययात्रा काढली.
 
 मुलगा नाही त्यामुळे वडिलांचा अंत्यविधी अडला नाही तर मुलींनी पार्थिवाला खांदा देऊन स्मशानभूमीत घेऊन गेल्या. त्यांनतर अग्निही मुलींनीच दिला त्यामुळं परिसरात हा विषय कुतूहलाचा ठरला .