जयेश जगड, झी मीडिया, वाशिम : वाशिम जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसतोय. सध्या वाशिम जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या एक आहे. मात्र संकट अजून टळले नाही ही बाब नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहेय. शेलूबाजार येथील एसबीआय आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया समोर विविध योजनेअंतर्गत आपल्या खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकेमार्फत नागरिकांच्या आरोग्याला लक्ष्यात घेता कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिल्याचे दिसुन आली नाही. बँकेसमोर नागरिकांची अशीच अलोट गर्दी असते. स्थानिक बँकेने नागरिकांना बसण्यासाठी आणि सावलीची तसेच पाणी पिण्याची सोय केली नाही. तर विशिष्ट अंतरावर उभे राहण्यासाठी खुणा तयार करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता भर उन्हात नागरिकांना चटके खात उभे राहावे लागत आहे.



बँकेने जरी सोशल डिस्टनसिंग करिता खुणा तयार केल्या नसल्या तरी नागरिकांनी हे पाळणे गरजेचे आहे.आता सोशल डिस्टन्सिंगकडे स्थानिक प्रशासन गंभीरपणे लक्ष देणार का ? की हा असाच प्रकार पुढे सुद्धा सुरुच राहील ? असा प्रश्न निर्माण झालाय.


सध्या कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्यात वाढत आहेत. अशात नागरिकांसह प्रशासनानेसुद्धा या बाबींकडे गंभीररित्या लक्ष देण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.