श्रीकांत राऊत, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Yavatmal Secretly Money: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काळी जादू, गुप्तधन मिळवण्याचा हव्यास यातून गुन्हे घडत असल्याचे समोर आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात एक धक्क्दायक घटना समोर आली आहे. गुप्तधन शोधण्यासाठी घरात भुयार खोदत असतानाच एक भयंकर घडलं अन् त्यामुळं एकावर मृत्यू ओढावला आहे. (Crime News Today)


गुप्तधन शोधण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कारंज लाड येथील विनेश कारिया यांच्या जुन्या घरात अघोरी प्रकार सुरू होता. याचवेळी गुप्तधन शोधण्यासाठी घरात खोल भुयार खोदण्याचे काम सुरू होते. भुयाराचे खोदकाम सुरू असतानाच देवराव बदुकले याच्या अंगावर मातीचा ढिगारा पडला.  गुप्तधन शोधण्यासाठी घरात भुयार खोदत असताना मलब्याखाली दबून त्याचा मृत्यू आला. मात्र, हा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी त्याच्या सहकाऱ्यांनी मृतदेह एका विहिरीत फेकून दिला होता. 


देवराव बदुकले असे मृताचे नाव असून एका विहिरीत त्याचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली होती. देवराव यांच्या पत्नीनेही ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. तसंच, याप्रकरणी मृताच्या पत्नीने संशय व्यक्त केल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार घातपाताचा असल्याची शंका उपस्थित झाल्याने पोलिसांनी तपास केला असता गुप्तधन शोधण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील विनेश कारिया यांच्या जुन्या घरात अघोरी प्रकार सुरु असल्याचे पुढे आले. घरात खोल भुयार खोदून गुप्तधन शोधत असताना देवरावच्या अंगावर मातीचा ढिगारा पडला, त्यात दबून त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे घाबरलेल्या विनेश, प्रशांत चिरडे आणि गंगाधर नेवारे यांनी मृतदेह एका विहिरीत फेकल्याचे उघड झाले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या 2 तारखेला एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तक्रार नोंदवल्यानंतर 4 दिवसांनंतर एका व्यक्तीचा विहिरीत मृतदेह सापडला होता. चौकशी केल्यानंतर मयत व्यक्ती मृत्यूच्या आधी त्याच्या मित्रांसोबत दिसला होता. पोलिसांनी त्यांच्या मित्रांना शोधून त्याची चौकशी केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. 


पोलिसांनी वाशिम येथील घरात जाऊन अघोरी पुजेचे साहित्यही ताब्यात घेतले आहे. तसंच, जिथे खोदकाम करण्यात येत होते. तिथून फावडा, कुदळ सारखी अवजारेही ताब्यात घेण्यात आली आहेत. पोलिसांनी अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गंत 2 जणांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.