नवी दिल्ली : देशात 70 वर्षांनंतर भारतीय भूमीवर चित्ते परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त नाम्बीयातून (Namibia) या 8 चित्यांना (Cheetahs) भारतात आणण्यात आलं असून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) सोडण्यात आले आहे. दरम्यान या चित्यांना भारतात आणण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतायत. या चित्यांना विमानातून नेमकं कस आणण्यात आलं होतं? विमानात या चित्यांसाठी काय खास व्यवस्था करण्यात आली होती? या सर्व प्रश्नांचे उत्तर खाली दिलेल्या व्हिडिओतून मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या वाढदिवसानिमित्त नाम्बीयातील (Namibia) 8 चित्त्यांना (Cheetahs) भारतात आणले होते. नंतर या चित्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कच्या (Kuno National Park)  खास परिसरात सोडण्यात आले होते. या चित्यांना बोईंगच्या विशेष विमानातून भारतात आणण्यात आले होते. दरम्यान या चित्यांना नाम्बीयातून आणण्यासाठी विमानात कशाप्रकारची खास व्यवस्था करण्यात आली होती, याची माहिती देणारा एक खास व्हिडिओ समोर आला आहे.  


विमानात खास तयारी 
बोईंगच्या विशेष विमानात या चित्यांना आणण्यासाठी दोन भाग करण्यात आले. एका ठिकाणी चार पेट्या ठेवण्यात आल्या होत्या तर आणखी चार पेट्या दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या चित्यांना स्वतंत्र लॉग बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. ज्या पेट्यांमधून चित्ते भारतात आणले होते ते खास डिझाइन केलेले होते. पेटीला बरीच छिद्र होती, ज्यामुळे चित्यांना श्वास घेण्यास त्रास होणार नाही आणि हवा आर पार जाऊ शकेल. तसेच विमानात डॉक्टरांचे पथकही तैनात होते. 


नाम्बीयाहून (Namibia) 8 चित्यांना घेऊन जाणारे बोइंगचे विशेष विमान सकाळी 7 वाजता ग्वाल्हेरच्या महाराजपुरा एअरबेसवर पोहोचले. त्यानंतर या चित्यांना चिनूक हेलिकॉप्टरने कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) हलवण्यात आले. या चित्यांमध्ये पाच माद्या आणि तीन नर आहेत.



दरम्यान देशातील चित्यांचे पुनर्वसन करण्याच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून, आठ चित्ते नाम्बीयातून (Namibia) भारतात आणले. या आठ पैकी,तीन चित्ते पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी कुनो नॅशनल पार्क (Kuno National Park) या भारतातील त्यांच्या नवीन निवासस्थानाच्या विशेष बंदोबस्तात सोडली होती, तर उर्वरित पाच इतर नेत्यांनी सोडले होते. या चित्यांची संपुर्ण भारतभर चर्चा आहे.