नाशिक : नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील म्हणजे एकदम डॅशिंग व्यक्तिमत्त्व... दबंग आणि कर्तबगार पोलीस अधिकारी... पण त्यांच्यात एक हरहुन्नरी कलाकार देखील दडलेला आहे, हे वास्तव आता समोर आलंय... त्यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय. औरंगाबादला आपल्या भाचीच्या लग्नात मामानं असा काही डान्स केला की, अक्षय कुमारनं देखील बोटं तोंडात घालावीत... तुम्ही पण पाहा... नांगरे पाटलांचा बाला डान्स... 


अधिक वाचा - 'सार्वजनिक कार्यक्रमातून वेळ काढा आणि शहरातलं पेट्रोलिंग वाढवा'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सेलिब्रिटी पोलीस' अशी विश्वास नांगरे पाटील यांची ओळख... सध्या ते नाशिक शहराचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. सोशल मीडियावर त्यांची भाषणं अनेकदा व्हायरल झालेली पाहायला मिळाली आहेत... त्यांचं डॅशिंग फोटोशूटही प्रचंड व्हायरल झालं होत. परंतु, पहिल्यांदाच विश्वास नांगरे पाटील एखाद्या गाण्यावर ताल धरताना दिसले. 


अनेकदा सोशल मीडियात आणि सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांना नुकतंच टीकेचं धनीही व्हावं लागलं. नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करताना 'सार्वजनिक कार्यक्रमातून वेळ काढा आणि शहरातलं पेट्रोलिंग वाढवा' अशी उपहासात्मक टीकाही नाशिककरांनी पोलिसांवर केलीय. 


परंतु, विश्वास नांगरे पाटील यांचा हा व्हिडिओ मात्र एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमातला नाही तर खासगी कार्यक्रमातला आहे. 'दबंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडक शिस्तीच्या पाटलांचा हा व्हिडिओ त्यामुळेच सोशल मीडियावर प्रेक्षकांना आकर्षित करतोय. या व्हिडिओत ते आपल्या मित्रांसोबत धम्माल करताना दिसत आहेत.