बापरे! पाहा रत्नागिरीत कसे घोंगावत आहेत वादळी वारे
निसर्ग चक्रीवादळ जसजसं महाराष्ट्राच्या किनारपट्टीनजीक पोहोचत आहे, तसतसं...
रत्नागिरी : Cyclone Nisarga निसर्ग चक्रीवादळ जसजसं महाराष्ट्राच्या किनारपट्टीनजीक पोहोचत आहे, तसतसं या वादळामुळं वातावरणात बदल होत आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अलिबाग, मुंबईसह मंगळवारी सायंकाळपासूनच रत्तनागिरीतही पावसाला सुरिवात झाली आहे.
बुधवारी सकाळच्या सुमारास म्हणजेच वादळ धडकणार असल्याच्या दिवशी एएनआय वृत्तसंस्थेकडून रत्नागिरीतील एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. या व्हिडिओमध्ये चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील उत्तरेकडी भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाऱ्याचं स्वरुप इतकं रौद्र आहे की मोठमोठे वृक्षही या वाऱ्यामध्ये हेलकावे खात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
वादळी वारे घोंगावत असल्यामुळं रत्नागिरीमध्ये नागरिकांनीही घरातच राहणं पसंत केलं आहे. दरम्यान, रत्नागिरीमध्ये सध्या ताशी १३ किलोमीटर वेगानं हे वादळ किनाऱ्याच्या दिशेनं पुढे जात आहे. थोडक्यात वादळाचा हा वेग क्षणाक्षणाला वाढत आहे. परिणामी अनेक वृक्ष उन्मळूनही पडल्याचं पाहायला मिळत आहे.
रत्नागिरी आणि परिसरामध्ये असणारं वादळाचं हे स्वरुप पाहता प्रशासनाकडून किनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय बहुतांश नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीतही करण्यात आलं आहे. समुद्राला उधाण आलं असल्यामुंळ येथील किनाऱ्यांवर लाटांचा मारा सुरु असल्याचं पाहायाला मिळत आहे.
वाचा : कोकण किनारपट्टीला १८९१ नंतर धडकणारे पहिलेच चक्रीवादळ
अतिशय वेगाने वाहणाऱ्या या वादळी वाऱ्यांचं स्वरुप पाहून असतानाच दुसरीकडे रत्नागिरीत समुद्रातही मोठ्या लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरीतील मिऱ्या समुद्रात अजस्त्र लाटामध्ये एक भरकटलेलं जहाज अडकल्याची माहिती समोर येत आहे. जहाजाला मिरकरवाडा बंदरात देण्याचे प्रयत्न असफल ठरत आहेत. या जहाजावर काही खलाशी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.