या पालिकाकेसह 18 गावांचा पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद
Water Pollution : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.
अलिबाग : Water Pollution : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे याचा फटका 18 गावांना बसणार आहे. पाणी प्रदुषणामुळे महाड नगर पालिका, एमआयडीसीसह आठरा गावांचा पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. (Pollution: Water supply cut off in Mahad MIDC, water problem in 18 villages)
महाड एमआयडीसीतील पाणी प्रदूषण झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर पाणी प्रदुषीत असल्याचे पुढे आले. महाड नगरपालिका, एमआयडीसीसह 18 गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. बंधारा आणि पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलमध्ये काळ्या रंगाचं दुर्घंधीयुक्त प्रदूषित पाणी मिसळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पंपींग स्टेशन, पाणी शुद्धीकरण यंत्रणा आणि बंधारा स्वच्छ करण्याचं काम सुरु आहे. सावित्री आणि काळ नदीच्या संगमावर एमआयडीसीने बंधारा बांधला आहे. या ठिकाणीचे पाणी उचलून त्याचा पुरवठा महाड एमआयडीसीमार्फत केला जातो. दोन दिवसांपूर्वी या धरण आणि जॅकवेलमध्ये काळ्या रंगाचे दुर्घंधीयुक्त प्रदूषित पाणी आल्याने महाड एमआयडीसीमार्फत होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.
पंपींग स्टेशन, पाणी शुद्धीकरण यंत्रणा आणि बंधारा स्वच्छ करण्याचे काम सुरु असून आहे. हे स्वच्छतेचे काम आणखी काही दिवस सुरु राहू शकते. यादरम्यान टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून या प्रदुषणास दोषी कारखाने, अधिकार्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे.