औरंगाबाद : मराठवड्याची तहान भागवण्यात महत्वाची भूमिका बजावणारं जायकवाडी धरण आज पहाटे पाच वाजता निम्मं भरलं आहे.  गेल्या २४ तासात धरण्यातल्या पाणी साठी १.१४ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याचा जलसाठा ६४.८९ टीएमसीवर जाऊन पोहचला आहे. दरम्यान धरणपरिसरात गेल्या २४ तासात पाऊस पडलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक आणि उत्तर नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडीकडे होणारा विसर्ग मोठ्याप्रमाणात वाढला आहे. त्यामुळेच जायकवाडीत पाणीसाठा वाढला आहे. गेल्यावर्षी २ ऑगस्टला जायकावाडीतला जलसाठा शून्य टक्के होता. यंदा मात्र जुलै महिन्यात गोदावरीच्या खोऱ्यात झालेल्या दमदार पावसानं मराठवाड्याला मोठा ऑगस्टच्या सुरुवातीलाच दिलासा मिळताना दिसतो आहे. गेल्यावर्षी पावसाळ्याच्या शेवटी जायकवाडी ८३% भरलं होतं. विशेष म्हणजे गेल्या ९ वर्षात जायकवाडी धरण एकदाही १०० टक्के भरलेलं नाही.