नाशिक : शहरात आज संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद असेल. पाईपलाईन गळती, बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचं लिकेज काढणं, तसंच अनेक ठिकाणी केबल जोडणीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे. चेहडी पंपिंग स्टेशन तसंच मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथे वीजपुरवठाही बंद ठेवण्यात येणार आहे. उद्याही कमी दाबानेच पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आता नाशिकरांना येते दोन दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे. याआधी देखील नाशिक मध्ये पाणी कपात करण्यात आलं होती. पणी कपातीमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नाशिककरांना आता दोन दिवसांचं वापरण्याचं पाणी आणि पिण्याचं पाणी साठवून ठेवावे लागणार आहे.


पाणी कपात झाल्यामुळे गृहिणींपुढे मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे. तर दोन दिवस पाणी जपून वापरण्याचं संकट नाशिककरांवर आहे. तर काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात दर गुरूवारी पाणी पुरवठा खंडीत करून कोरडा दिवस पाळण्यात येत होता. 


पण आता तो रद्द करण्यात आला आहे. मात्र संपुर्ण शहरात एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. गंगापूर धरणात पाणी साठा वाढल्याने नाशिककरांच्या पाणी कपातीचे संकट टळले आहे. 


तर सध्या फक्त दोन दिवसांसाठी काही महत्त्वाच्या कामांसाठी नाशिक शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय काही ठिकाणी विज पुरवठा देखील वीजपुरवठाही बंद ठेवण्यात येणार आहे.