नवी मुंबई : Water supply : काही दुरुस्तीच्या कामामुळे सिडकोकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे. नवी मुंबईतील सिडकोकडून हेटवणे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे खारघर, तळोजा, द्रोणागिरी, उलवा, जेएनपीटी बंदर आणि संबंधित गावांना गुरुवारी आणि शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नाही. (Water supply in Navi Mumbai will be closed for two days)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शिवाय कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे सिडको प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 


दरम्यान, गेल्या आठवड्यात उलवे येथील 1500 मिली मीटर व्यास असलेल्या जलवाहिनी दुपारी फुटली होती. जलवाहिनी फुटल्याने  खारघर येथील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. याचा परिणाम हा द्रोणागिरी-उलवे येथील पाणीपुरवठा झाला होता. दुरुस्तीच्या कामाला 10 तासांपेक्षा जास्त वेळ लागल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती.