निलेश वाघ, झी २४ तास, देवळा : पाण्याचा टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातात तरुण शेतकरी ठार झाल्याची दुर्दैवी घटना देवळा तालुक्यातील मेशी गावात घडली. सोपान तुळशीराम चव्हाण असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पावसाळा सुरु होऊन दिड महिना उलटला तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने आधीच शेतकऱ्यांना भीषण पाणी टंचाईचा सामाना करावा लागत आहे. यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोपान पहाटे ६ वाजेच्या सुमारास पिण्यासाठी आणि जनावरांसाठी टँकरने  पाणी आणण्यासाठी जात असताना मेशी- महालपाटणे रस्त्यावरील गिरणा उजव्या कालव्याच्या पुलाजवळ टँकर पलटी झाला. सोपान टँकरखाली दाबला गेल्याने जागीच मरण पावला. 



स्थानिक ग्रामस्थांनी  जेसीबीच्या सहाय्याने टँकर सरळ करत सोपानचा मृतदेह काढला. दुष्काळामुळे एका तरुण शेतकऱ्याचा बळी गेल्याने  सर्वत्र  हळहळ व्यक्त केली जात आहे