उजनी धरणाचा रूद्रावतार, समुद्रासारख्या उसळल्या लाटा
धरणात समुद्रासारख्या उसळत होत्या लाटा
पुणे : वादळी वाऱ्यामुळे उजनी धरणातील पाण्याने रूद्रावतार धारण केला होता. धरणातील पाणी समुद्रातल्या पाण्याप्रमाणे उसळत होतं. उजनी धरण सध्या १०० टक्के भरलंय. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पाणी आहे. रविवारी दुपारी सोसाट्याचा वारा वाहायला लागल्यावर पाण्यातल्या लाटा उंचच उंच उसळ्या घेत होत्या. उजनीचा हा रूद्रावतार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.
उजनी धरणात समुद्रात भरतीच्या जशा लाटा उसळतात तशा मोठ्या लाटा उसळल्या होत्या. या लाटा पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. इंदापूर तालुक्यातील भिगवण - खानोटा रस्त्यावर जुन्या ब्रिटिशकालीन पुलाजवळ या लाटा उसळत होत्या. वाऱ्यामुळे या लाटा उसळत असल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे.