ठाणे : कचऱ्यात सापडलेले जिवंत ५९ बॉम्ब रितसर परवानगी घेऊन निकामी करण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यातील गुन्हे शाखेने 2015 मध्ये डायघर  पोलीस स्थानकाच्या हद्दीतून कचऱ्यातून जवळपास 76 बॉम्ब हस्तगत केले होते. त्यामधील ५९ बॉम्ब जिवंत होते. आता रितसर परवानगी घेऊन हे जिवंत बॉम्ब निकामी करण्याचं काम शिलाडघरच्या हद्दीतील ठाकूर पाडा या डोंगराळ भागात सुरु आहे. 


यासाठी खासकरून दिल्लीहून NSG, बॉम्ब स्कॉड पथक ,अग्निशामक दल, ठाणे पोलीस फॉरेन्सिक तज्ज्ञ, आणि डॉक्टर तसंच ठाणे गुन्हे शाखेची एक टीम घटनास्थळी आली होती. आता ही सर्व टीम पुन्हा उद्या बॉम्ब निकामी करण्याचा प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.