Weather Forecast : मान्सून सक्रिय, `या` भागांमध्ये पुढील काही तास मुसळधार पावसाचा अंदाज
मेगा ब्लॉक रद्द पण...
मुंबई : मान्सूनच्या सरींनी जवळपास महाराष्ट्र आणि भारताचा अधिकांश भाग व्यपला आहे. देशातील बऱ्याच भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. शुक्रवारपासून कोकण आणि मुंबईतही पावसाच्या सरींचा जोर पाहायला मिळाला. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये काही ठिकाणी पावसामुळे वाहतूक आणि सर्वसामान्यांचं जीवन काही प्रमाणात विस्कळीतही झालं. मुंबईच्या रेल्वे वाहतुकीवरही पावसाचे परिणाम पाहायला मिळत आहेत.
मेगा ब्लॉक रद्द पण...
मध्य रेल्वेवरील वाहतून रविवाच्या दिवशी रद्द करण्यात आला आहे. तर हार्बर मार्गावर मात्र मेगा ब्लॉक असणार आहे. वडाळा ते मानखुर्द अप- डाऊन मार्गावर हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ११.१० मिनियांपासून ४. १० मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असेल.
जवळपास ४८ तासांहून अधिक काळापासून पडत असणारा पाऊस उसंत घेत नसल्याचं पाहायला मिळत आहे. पुढचे १२ तास मुंबई आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची कोसळधार असल्याचा अंदात हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गरज असल्यासच घराबाहेर पडण्याला नागरिकांकडून प्राधान्य देण्यात येत आहे.
सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी काही दुर्घटना झाल्या. संरक्षक भिंत कोसळून पुणे, घाटकोपर येथे मोठ्या दुर्घटना घडल्या, तर कुठे रेल्वे स्थानकाचा भाग खचल्यामुळे पाहायला मिळालं. ऐन पावसाच्या या दिवसांमध्ये होणाऱ्या दुर्घटना आणि होणारी जीवित हानी पाहता प्रशासनावर या प्रकरणामुळे जोरदार टीका करण्यात येत आहे.
राज्यात मुसळधार
आंबेगावमध्ये पावसाचं थैमान.
रायगड, कोल्हापूर या भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद.
मुसळधार पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी १० फुटांनी वाढली आहे.
राजाराम शिंगणापूर बंधारा पाण्याखाली.
विरार रेल्वे स्थानक फलाटाचा काही भाग खचला.
जालना, जळगाव, धुळे येथे जोरदार पाऊस.
भात लावणीच्या कामांना वेग