Weather Update : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यात थंडीची चाहूल लागली. बहुतांश भागांमध्ये किमान तापमानाच घटही नोंदवण्यात आली. पण, या महिन्याचा दुसरा आठवडा ओलांडला आणि राज्यातील किमान तापमानासह कमाल तापमानाही वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं राज्यातील थंडीचं प्रमाण काहीसं कमी झालं असून, सकाळच्या वेळी तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात दुपारच्या वेळी तापमानाच वाढ झाल्याचं पाहायला मिळत असून, हवेतील आर्द्रतेमुळं तापमान जास्तच असल्याचं भासत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सोमवारी कोल्हापूर, सिंधुदुर्गासह सातारा आणि सांगली या पट्ट्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


पुन्हा उन्हाचा दाह? 


कमाल तापमानात वाढ झाल्यामुळं राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा उष्णतेचा दाह वाढल्याचं स्पष्ट होत आहे. कोकणापासून ठाणे, पालघर, मुंबईमध्ये हे प्रमाण तुलनेनं जास्त राहील अशी शक्यता आहे. मुंबईमध्ये हवेत धुरक्याचं प्रमाण असल्यामुळं दृश्मानताही कमी राहील. ज्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन यंत्रणा करत आहेत. 


तापमानाची नोंद.... 


सध्याच्या घडीला जळगाव आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता राज्यात विचित्र हवामान पाहायला मिळत आहे. महाबळेश्वरमध्ये कमाल तापमान 31 अंश आणि किमान तापमान 15 अंशांमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. पुण्यात कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 18 अंश, रत्नागिरीत कमाल तापमान 36 आणि किमान 24 अंश पाहायला मिळेल. तर, परभणीत कमाल तापमान 32 आणि किमान तापमान 18 अंशांवर असेल. नागपूरमध्ये कमाल तापमानाचा आकडा 32 आणि किमान तापमानाचा आकडा 16 अंशांवर असेल. 


हेसुद्धा वाचा : बापरे! वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यावर वाईट परिणाम; पाहून म्हणाल ही काय वेळ आली... 


 


हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये तापमानाचा आकडा घटणार आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागांमध्ये पर्वतीय क्षेत्रांमध्ये हिमवृष्टी होणार असून, मैदानी भागांमध्ये याचे परिणाम कडाक्याच्या थंडीत दिसणार आहे. लडाखमधील अनेक दुर्गम गावांमध्येही बर्फाची चादर पाहायला मिळणार आहे. तर, देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मात्र पावसाची हजेरी दिसेल.