प्रताप नाईक / कोल्हापूर : Wedding cheating : लग्न करताना सावधान राहा. कारण लग्न झाल्यानंतर तुमची मोठी फसवणूक होवू शकते. होय, हे खरं आहे! सद्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात काही ठिकाणी लग्नाळू व्यक्तीची फसवणूक करण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. विवाहानंतर महिनाभरात नववधू सोने-चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन पलायन केलेच्या घटना उघडकीस आल्या आहेत.  अशीच घटना गुन्हा वस्त्रोद्योग नगरी इचलकरंजीमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यस्तीमार्फत विवाह ठरला आणि लग्नही झाले. त्यानंतर महिनाभरात नवविवाहिताअंगावरील सोन्याचे दागिने आणि रोकड घेऊन पसार झाल्याची घटना इचलकरंजी शहरात घडली आहे. या प्रकरणी विनोद अशोक उत्तुरे (राहणार कबनुर ) यांनी शिवाजीनगर पालिसात फिर्याद दिली आहे.


इचलकरंजी शहर परिसरात राहणाऱ्या सीमा जगदीश मोदानी (रा. कबनुर ), माधुरी शशिकांत चव्हाण ( रा.कबनुर ) शहीदा सरदार बागवान ( रा.रुई ) फारुख सरदार बागवान ( रा. रुई ), रेखा घाटगे ( रा.जयसिंगुर ) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला  आहे. यातील सीमा, माधुरी, शहीदा आणि फारुख हे चौघे वधुवर सूचकाचे काम करतात. त्यामुळे विनोद उत्तुरे हे लग्नासाठी मुली बघत असल्याची माहिती यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी  विनोद उत्तुरे यांना रेखा घाटगे हीचे स्थळ सुचविले. त्यानंतर विवाहाची बोलणी झाल्यानंतर रेखा हिचा विवाह विनोद उत्तुरे याच्या बरोबर लावून दिला.


त्यानंतर लग्नाची फी म्हणून 50 हजार रुपये घेतले. या लग्नात रेखा हिला सोन्याचे दागिने आणि पूजेच्या दिवशी तीन तोळ्याचे घंठन दिलं. यानंतर रेखा घाटगे ही एक महिना विनोद उत्तुरे याच्या बरोबर संसारही थाटला. त्यांनतर मात्र मी माहेरी जाते अशी बतावणी करुन घरातून निघून गेली. यानंतर विनोद उत्तुरे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी इचलकरंजीमधील शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद केलाय. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करुन  आरोपीचा शोध सुरु केलाय.


अशी घटना फक्त इचलकरंजी शहरातील विनोद अशोक उत्तुरे यांच्याबरोबर घडली आहे असं नाही. तर महाराष्ट्तल्या अनेक भागात  त्याचबरोबर सीमा भागात  घाईगडबडीत लग्न उरकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांच्या बाबतीत घडली आहे. त्यामुळे लग्न करणाऱ्यानो सावधान.