कोल्हापूर : राज्य कोरोनाच्या संकटातून चालले असताना पन्हाळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विहीर कोसळून पाच जणांचा मृत्यूची झाल्याचा दुर्देवी प्रकार समोर आलाय. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं ही घटना घडली. कोडोली काखे मार्गावर विहीर कोसळून एका मजुरासहित चारजण गाडले गेल्याचे वृत्त हाती येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या घटनेत दोघा जणांना वाचवण्यात यश आले आहे. विहिर कोसळल्याची बातमी कळताच आजुबाजुची माणसं गोळा झाली. अदयाप स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु आहे. ही घटना नेमकी कशी घडली ? याची चौकशी सुरु आहे.