पुणे : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून शासकीय नोकरीच्या पेपरफुटीचं (Maharashtra Govenrmenr Job Paper Leck) पेव फुटलं आहे. टीईटी, आरोग्य विभाग तसेच म्हाडाच्या परीक्षांचे पेपर फुटल्याने एकच खळबळ माजली. दरम्यान आता बोगस भरती प्रकरण पुणे जिल्ह्यातून (Pune) उघड झाला आहे. या प्रकरणी एकूण 16 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद  (Pune Zp Ceo Aush Prasad) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (Western Maharashtra Pune gram panchayat bogus Recruitment Scam Suspension of 2 Agriculture Extension Officers including 14 Gram Sevaks)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे महानगरपालिकेत 20 ग्रामपंचायीतीचा समावेश करण्यात आला. या समाविष्ट करण्यात आलेल्या 20 ग्रामपंचायतीसाठी नोकर भरती करण्यात आली होती. मात्र ही नोकरभरती बोगस असल्याचं स्पष्ट झालं.  



या प्रकरणी एका झटक्यात 14 ग्रामसेवकांसह 2 कृषी विस्तार अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणी 22 अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तसेच संबंधित ग्रामपंचायतीमधील 212 माजी ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा पाठवण्यात आलं आहे.