मुंबई : वेस्टर्न रेल्वेत मोठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. 3612 जागांसाठी रेल्वे रिक्रुट बोर्डाने ही भरती काढली आहे. विशेष म्हणजे विनापरीक्षा या भरतीत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे असंख्य तरूणांचे रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण होणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3612 जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज कारण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.


विनापरीक्षा होणार भरती 
अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या 10वी आणि ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीनंतर विविध ठिकाणी नियुक्ती मिळेल. अप्रेंटिसशिप 1 वर्षाची असेल आणि यादरम्यान उमेदवारांना निश्चित स्टायपेंड दिला जाईल.


एकूण पदसंख्या : ३६१२


पदाचे नाव व पदसंख्या :
1) फिटर 941
2) वेल्डर 378
3) कारपेंटर 221
4) पेंटर 213
5) डिझेल मेकॅनिक 209
6) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) 15
7) इलेक्ट्रिशियन 639
8) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 112
9) वायरमन 14
10) Reff. & AC मेकॅनिक 147
11) पाईप फिटर 186
12) प्लंबर 126
13) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 88
14) PASAA 252
15) स्टेनोग्राफर 08
16) मशीनिस्ट 26
17) टर्नर 37


शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT


वयाची अट : २७ जून २०२२ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]


शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]


वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.


नोकरी ठिकाण : पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)


ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


अर्ज करण्यासाठी :  rrc-wr.com