1909 चे हैदराबाद निजामाचे गॅझेट लागू करण्याची का होतेय मागणी? मराठा आरक्षणाशी कनेक्शन काय?
Dharashiv Hyderabad Nizams Gazette: निजामकालीन 1909 चे हैदराबाद गॅजेट नेमके काय आहे?
Dharashiv Hyderabad Nizams Gazette: गेल्या एक वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे हैदराबाद गॅजेट लागू करून मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी सुरुवातीला केली होती आणि आताही तीच मागणी पुढे येताना दिसत आहे. निजामकालीन 1909 चे हैदराबाद गॅजेट नेमके काय आहे? जाणून घेऊया.
निजामकालीन हैदराबाद गॅझेटमध्ये 1909 च्या नोंदीनुसार मराठा आणि कुणबी ही एकच जात असल्याचं दर्शवण्यात आले आहे. त्याचबरोबर जात आणि करत असलेल्या व्यवसायाचीही नोंद यामध्ये दर्शवण्यात आली आहे.तसेच मराठा आणि कुणबी ही एकच असल्याचे या गॅझेटमध्ये सांगण्यात आलंय.
हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मागणी
2004 साली सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री आणि विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना विदर्भातील मराठा समाजाला याच गॅजेटच्या आधारे ओबीसीतून आरक्षण दिल्याचा दाखला देण्यात येतोय. तसेच खानदेश मध्येही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात आले आहे.17 सप्टेंबर च्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात ही हैदराबाद गॅजेट लागू करावी अशा मागणीचा उठाव होताना दिसत आहे.
हैदराबाद गॅझेट लागू करणार का?
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरामध्ये आणखीही निजाम कालीन 1909 च्या गॅजेटनुसार" देऊन ए कवायत" या कायद्यानुसारच सर्व विधी आणि नियमावली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज्य सरकार हैदराबाद गॅझेट लागू करणार का? हे पाहणे गरजेचे आहे.
आरक्षण न मिळणं हा अन्याय,न्यायासाठी उपोषण सुरू केलंय- जरांगे
आरक्षण न मिळणं हा अन्याय आहे. न्यायासाठी उपोषण सुरू केलंय.कुणी बोलो अथवा न बोलो आम्ही लढा सुरुच ठेवणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास जनतेपुढे तुम्ही जबाबदार असाल असे ते म्हणाले.आम्हाला आरक्षण असूनही दिलं जात नाही. अखंड महाराष्ट्रात येऊन आम्ही चूक केली का? असा प्रश्न त्यांनी विचारला. जरांगे अंतरवाली सराटीत काल रात्रीपासून आमरण उपोषणाला बसलेत.आमच्या मागण्यांबाबत कुणी बोलो अथवा न बोलो आम्ही लढा सुरुच ठेवणार आमच्या मागण्या मान्य न झाल्यास जनतेपुढे तुम्ही जबाबदार असा ईशाराही जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसह फडणवीस यांना दिला.
अधिवेशन घ्या, आता पळकुटेपणा करु नका
सत्ताधाऱ्यांना फक्त खुर्ची दिसते,फडणवीस यांना ही शेवटची संधी. आरक्षण न दिल्यास माझ्या वाटेला जाऊ नका मी गुडघ्यावरच टेकविन. प्रत्येकवेळी आमची चेष्टा करणार असाल तर तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा त्यांनी फडणवीसांना दिला.
अधिवेशन कशासाठी घेताय? हा विषय लोकांना सांगा, दोन दिवस अधिवेशन घ्या आता पळकुटेपणा करु नका,खिचडी करु नका,आरक्षणासाठी स्वतंत्र दिवस ठरवा असेही ते म्हणाले.
आरक्षणासाठी स्वतंत्र दिवस ठरवा
प्रत्येकवेळी आमची चेष्टा करणार असाल तर तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल असंही जरांगे फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.
अधिवेशन कशासाठी घेताय हा विषय लोकांना सांगा. दोन दिवस अधिवेशन घ्या आता पळकुटेपणा करु नका,खिचडी करु नका,आरक्षणासाठी स्वतंत्र दिवस ठरवा अशी मागणी जरांगे यांनी केली.