Tukaram Beej 2023 : संत तुकाराम बीज का साजरी होते, तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहिती आहे का?...
Tukaram Beej 2023 : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा तुकाराम बीज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे. देहूनगरी वारकऱ्यांनी फुलली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने देहूनगरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले नाही. म्हणून वारकरी नाराज आहेत.
Tukaram Beej 2023 : ‘आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा, रामराम घ्यावा’ असं म्हणत संत तुकाराम महाराज वैकुंठास गेले. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरी केली जाते. यंदा 375 वा तुकाराम बीज सोहळा आहे. त्यामुळे देहूनगरी वारकऱ्यांनी फुलली आहे. देहुनगरीतील मुख्य मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजाचा हताश झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यामुळे बळीराजा तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन घेऊन साकडं घालताना दिसतं आहे.
मंदिरातील ते झाड खूप महत्त्वाचं
तुकाराम बीजेचा सोहळा याचि डोळा पाहायला लाखो वारकऱ्यांनी देहूनगरीत एकच गर्दी केली आहे. तुकाराम बीज सोहळाच्या दिवशी मंदिरातील परिसरातील एक झाड थरारतं अशी आख्यायिका आहे. त्यामुळे तुकोबायांच्या दर्शनासोबत नांदुरकी झाडाचं दर्शन वारकरी घेतात. (what is the meaning of tukaram beej 2023 maharashtra pune Dehu city news in marathi )
काय आहे तुकाराम बीज सोहळा?
पौराणिक आख्यायिकानुसार तुकोबायांनी समाजातील अनिष्ट रुढी परंपरेबद्दल कीर्तनाच्या माध्यामातून टीका केली होती. तुकोबायांच्या या टीकेनंतर विठूरायांना दर्शन देणे भाग पडलं. तेव्हा तुकोबांनी विठ्ठलाला तुझ्या पायाशी सेवा घडावी असा आग्रह धरला. त्यानंतर विठूरायानी तुकोबांसाठी रथ पाठला आणि त्यानंतर तुकोबांनी ‘आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा, रामराम घ्यावा’ असं म्हणतं देहू नगरी सोडून वैकुंठाला गेले.
कोरोनामुळे दोन वर्ष हा सोहळा होऊ शकला नाही. गेल्यावर्षी हा सोहळा दिमाखात पार पडला. या दैदीप्यमान सोहळ्यासाठी हजारो वारकरी देहूनगरी दाखल झाले आहेत.