मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे तिकिट किती असेल, किती काम पूर्ण झाले? सर्व प्रश्नांची उत्तरे वाचा
Mumbai-Ahmedabad Bullet Train Project: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार आहे. पण याचे तिकिट भाडे काय असेल?
Mumbai-Ahmedabad Bullet Train Project: देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला गती आली आहे. 2026 पर्यंत बुलेट ट्रेन देशवासियांच्या सेवेत असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले भूसंपादन प्रक्रिया पार पडली आहे. तसंत, बोगद्याचे कामही प्रगतीपथावर आहे. त्यामुळं पंतप्रधान मोदींचा ड्रिम प्रोजेक्ट असलेली बुलेट ट्रेन लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. याचवेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेनचे काम कितपर्यंत झाले आहे आणि त्याचे भाडे किती असेल याबाबत माहिती दिली आहे.
अश्विनी वैष्णव यांनी NDTVला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. वैष्णव यांनी म्हटलं आहे की, सूरतमध्ये सकाळचा नाश्ता करुन मुंबईत तुम्ही पुन्हा कामासाठी येऊ शकता. त्यानंतर रात्री पुन्हा तुमच्या कुटुंबाकडे परत जाऊ शकता. जगात जिथे-जिथे बुलेट ट्रेन आहेत तेथील 90 टक्के लोक लांबचा प्रवास बुलेट ट्रेननेच करतात.
किती असेल प्रवास भाडे?
बुलेट ट्रेनचे प्रवासी भाडे म्हणजेच तिकिट किती असेल? याबाबत रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांना प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलं आहे की, बुलेट ट्रेनचे तिकिट विमानापेक्षा स्वस्त अणसणार आहे. सर्वसामान्यांना परवडणारे असणार आहे. असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरसाठी 8 नद्यांवर पुल निर्माणाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रोजेक्टचा एकूण खर्च जवळपास 1.08 लाख कोटी रुपये इतका आहे. यातील 10 हजार कोटी केंद्र सरकारकडून खर्च केला जात आहे. तर, महाराष्ट्र आण गुजरात सरकार 5 हजार कोटींचा निधी देणार आहेत. तर, या उर्वरित रक्कम जपानकडून कर्जाऊ घेतली जाणार आहे. याचा व्याजदर फक्त 0.1 टक्के इतके असणार आहे.
मुंबई अहमदाबाद प्रकल्पाचे काम 2021मध्ये सुरू झाले होते. ते आत्तापासून काम सपरू आहे. याआधी एका अहवालात सांगण्यात आले होते की मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे तिकिट दर जवळपास 250 ते 3 हजार इतके असणार आहे. मात्र, अद्याप याला प्रशासनाने दुजोरा दिलेला नाहीये. तर, भविष्यात दिल्ली ते अयोध्यादरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबतही हालचाली सुरू आहेत. जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर आर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
महाराष्ट्रात किती स्थानके असतील
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोरवर साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी स्थानक असणार आहेत.