MNS Raj Thackeray BJP Alliance : राज ठाकरेंच्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेची भूमिका काय असणार, हे राज ठाकरे जाहीर करणार आहेत. मनसे महायुतीत सामील होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षीप्रमाणे शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर होणारा हा गुढीपाडवा खास आहे. कारण या मेळाव्याआधी पडद्याआड बरंच काही राजकारण घडलं आणि केंद्रबिंदू होते खुद्द राज ठाकरे. 
राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. मनसे महायुतीत सामील होणार, असं बोललं जात होतं. अगदी राज ठाकरेंच्या हातात शिवसेना येणार आणि मनसेचे उमेदवार धनुष्यबाणावर लढणार इथपर्यंत तर्क लढवले गेले. मात्र या भेटीगाठींना दोन आठवडे उलटले तरी पुढे काहीच घडलं नाही.


अचानक सा-या चर्चा बंद झाल्या. बंद दारा-आड नेमकी काय चर्चा झाली, काय वचनं दिली गेली. याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे आणि नेमका हाच धागा राज ठाकरेंनी पकडला आहे. नक्की काय घडतंय, काय घडलंय हे सांगण्याची वेळ आलीय म्हणत राज ठाकरेंनी मोठी भूमिका जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत.  मनसे महायुतीत सामील झाली तर त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील याचा परिणाम होणार आहे.


राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले तर काय होईल?


राज ठाकरेंच्या रुपानं चौथा भिडू महायुतीत आल्यास लोकसभा निवडणुकीची गणितं बदलू शकतात.  मनसे सोबत आल्यास मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर याठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना फायदा होऊ शकतो, असा अंदाज आहे.  लोकसभेसह विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत मनसेमुळे महायुती बळकट होईल.  आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेची भूमिका काय असेल, अमित शाहांसोबतच्या बंद दाराआड चर्चेत नेमकं काय घडलं, मनसे महायुतीसोबत जाणार..स्वबळावर लढणार की निवडणुकीपासून अलिप्त राहणार. अशा चर्चा होताना दिसतायत. या सा-या चर्चांची उत्तरं गुढीपाडव्याच्या सभेत मिळतील हे निश्चित. 


शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट


शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली.. 9 तारखेला राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यातून आपली भूमिका मांडणार आहेत. या मेळाव्याआधी शिरसाट-राज ठाकरेंच्या भेटीला महत्त्व आलंय...त्यामुळे राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार का? या चर्चांना पुन्हा उधाण आलंय.