रत्नागिरी : रत्नागिरीत सध्या बॉनरबाजी पाहायला मिळत आहे. सिंधुदूर्ग जिल्हा बँकेवर भाजपाने म्हणजेच, नारायाण राणेंच्या गटाने सत्ता मिळवल्यानंतर ही बॅनरबाजी सुरू झाली. एवढेच काय तर ही बॅनरबाजी करुन त्यांनी शिवसेनेला टोला लावला. ज्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना यांच्यातील वैर सर्वांसमोर आलं आहे. ज्यामुळे कोकणात फक्त एकच चर्चा होत आहे. ती म्हणजे या बॅनरबाजीची


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतोष परब हल्ला प्रकरणानंतर राणे आणि शिवसेना यांच्यातलं राजकीय वैर पेटलं आहे. आज उच्च न्यायालयात भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपुर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.


दरम्यान राणे गटाचा हा विजय संपुर्ण कोकणात वेगवेगळ्या माध्यमातून साजरा हाऊ लागला आहे.



शिवसेनेच्या बालेकिल्यात देखील आता राणे समर्थकांनी त्यांच्या विजयाबद्दल बॅनर लावलेत. यामुळे कोकणात आता भाजपकडून पोस्टर वॉर सुरु झाले आहे.


राणेंच्या समर्थकांनी लावलेल्या या पोस्टरवर नारायण राणे नितेश राणी आणि राजकिय लोकांच्या फोटोसह वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज लिहिलेले पाहायला मिळत आहेत. ज्यावर त्यांनी लिहिले की, "सुअर तो झुंड में आते हे शेर तो अकेला आता है. माईंड इट." ज्यामुळे नारायण राणेंचीच सर्वत्र चर्चा आहे.