India's First Bullet Train: भारतीय रेल्वे रूळांवर पहिल्यांदा बुलेट ट्रेन धावणार आहे. मात्र, नागरिकांना बुलेट ट्रेनसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन जपानमधून येणार असून भारतीय रेल्वेकडून त्यासंदर्भात बोलणं सुरू आहे. मात्र, बुलेट ट्रेन कधी धावणार याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वेकडून अद्याप जपानच्या अधिकाऱ्यांकडून बोलणं सुरू आहे. अंतिम  झाल्यानंतर भारतातून धावणाऱ्या पहिल्या बुलेट ट्रेनची मॅन्युफॅक्चरिंग आणि पुरवठा शेड्युल अंतिम करण्यात येईल. यात कमीत कमी दोन वर्षांपर्यंतचा वेळ लागू शकतो. भारतातील पहिली बुलेट ट्रेनचे संचालन गुजरातच्या अहमदाबादहून महाराष्ट्रातील मुंबई दरम्यान धावणार आहे. 


रिपोर्टनुसार, मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी जपानी बुलेट ट्रेन शिंकनसेन E5 चालवण्याबाबत चर्चा सुरू आहे. ही ट्रेन ताशी 320 किलोमीटर वेगाने धावणार आहे. हा हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर हा भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. हा कॉरिडॉर ताशी 250 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या सेमी-हाय स्पीड ट्रेन्सच्या चाचणीसाठी देखील वापरला जाईल.


भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी शिंकनसेन E5 ही ऑर्डर या वर्षाच्या अखेरीस दिली जाईल, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉरिडॉर (NHSRCL) च्या एका अधिकाऱ्याने वृत्तपत्राला सांगितले की, शिंकनसेन E5 च्या ऑर्डरसाठी वाटाघाटी सुरू आहेत. ज्याला लवकरच अंतिम स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे.


NHSRCL च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद-मुंबई कॉरिडॉरवर बुलेट ट्रेन ताशी 350 किमी वेगाने धावणार आहेत. सध्या बुलेट ट्रेन ताशी 320 किमी वेगाने चालवण्यात येऊ शकते. भारतात सेमी-हाय स्पीड ट्रेन बनवण्याचे कामही वेगाने सुरू आहे. इंटिग्रेल कोच फॅक्टरीत या महिन्याच्या सुरुवातीला दोन चेअर कार हायस्पीड ट्रेनसाठी निविदा काढण्यात येणार आहे. राजधानी व जधानी आणि शताब्दी सारख्या प्रीमियम ट्रेनच्या जागी भविष्यात सेमी-हाय स्पीड ट्रेन चालवल्या जाऊ शकतात. ज्यांचा वेग ताशी 250 किलोमीटर असेल. सध्या राजधानी आणि शताब्दी सारख्या प्रीमियम ट्रेन ताशी 130 किलोमीटर वेगाने धावतात.