DeLisle Bridge Update: लोअर परळ येथील डिलाईल रोडचे आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी यांनी उद्घाटन केल्याचा वाद चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असतानाच आता मुंबई महानगरपालिकाही अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. तसंच, पुलाचे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोअर परळ येथील डिलाईल रोडची एक लेन गणेशोत्सवाच्या आधी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. मात्र पूर्ण क्षमतेने पुल खुला करण्यात न आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुलाचे उर्वरित काम पूर्ण करुन लवकरच पूर्ण क्षमतेने पुल खुला करण्याचे महापालिकेचे काम सुरू आहे. मात्र, पुलाच्या दुसऱ्या लेनचे काम पूर्ण होत आल्यानंतर गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पुलाचे उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यानंतर पालिकेला जाग आली आहे. 


ठाकरे गटाच्या नेत्यांकडून लोअर परळ पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर मात्र पालिकेने उर्वरित काम पूर्ण करण्याचा वेग वाढवला आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीर रित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून डीलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले आणि या विरोधात आता मुंबई महापालिका ॲक्शन मोड मध्ये आलेली पाहायला मिळतीये.


पुल कधी सुरू होणार? 


या डिलाई रोडवर इतर कामे अपूर्ण असताना आणि साधारणपणे सात दिवसानंतर ह्या ब्रिजचं काम पूर्ण करून ही लेन सुरू करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केलेला असताना अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर असल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकारांचे म्हणणं आहे.


महापालिकेकडून पुलाची राहिलेली लहानसहान कामे करण्याचा वेग वाढवण्यात आला आहे. काही ठिकाणी रंगकाम, फायनल टचेस करण्याची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर येत्या सात दिवसांच्या आत हा पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. 


पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्टेशनजवळ ना. म. जोशी मार्ग (डिलाइल पूल) व गणपतराव मार्ग यांना हा पूल जोडतो. आयआयटी मुंबईनं २०१८ मध्ये डिलाईल रोडला जोडणारा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर या पुलावरील वाहतूक बंद करुन पुलाचं काम सुरू करण्यात आले होते. 


गुन्हा दाखल 


आदित्य ठाकरे यांच्यावर ना.म.जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीलाईल रोडवर लोअर परळ येथील पुलाच गुरुवारी अवैधरित्या उदघाटन केलं होत.या पुलाच अजून पूर्ण काम झालं नसल्याने हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. यावर पालिकेच्या रस्ते विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती त्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आदित्य ठाकरे, आमदार सुनील शिंदे आणि आमदार सचिन अहिर यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे