पुणे : मनसेच्या (MNS) वर्धापन दिनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महापालिका निवडणुकीबाबत (Municipal Election) भाकित वर्तवलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्यावर ही निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता दोन दिवसांपूर्वी कळलं निवडणुक होत नाहीएत, निवडणुका लांबणीवर पडणार म्हटल्यावर आता सगळे थंड झाले आहेत. निवडणूक आली की निवडणूक चढायला लागते. वातावरणात निवडणूक यायला लागते.  यासाठी ओबीसी समाजाचं कारण पुढे केलं. सगळं झुठ आहे. यांना निवडणुका घ्यायच्याच नव्हत्या. 


मला कोणाच्या आरोग्याविषयी बोलायचं नाहीए, मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली नाहीए मला मान्य आहे याबद्दल मला बोलायचं नाहीए,  तीन महिने निवडणुका पुढे ढकल्या आहेत म्हणजे आता जूनमध्ये होणार असल्याचं बोललं जात आहे. यासाठी ओबीसी समाजाचं कारण पुढे केलं जात आहे, पण खरं कारण वेगळंच असल्याचं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर बोट ठेवलं.


एकदा जनतेचा, समाजाचा कानोसा घ्या, लोकांना काहीही फरक पडत नाहीए. कित्येकांना निवडणुका लढवायची नसते. त्यांना फक्त कमाई करायची असते.


निवडणुका लांबणीवर पडणार हे मी नोव्हेंबरमध्ये सांगितलं होतं. आतापासून बोरं वेचून ठेवली आहेत मी, पण यांना निवडणुका होऊच नयेत असं वाटतंय, प्रशासक नेमावा म्हणजे दोन्ही बाजूने विन विन सिच्युएशन. सरकारपण हातात, महापालिकेचा प्रशासक पण हातात, सर्व आम्हीच बघणार. 


आता जरी निवडणुका लागली असती तरी कोणाला त्यात रस नाहीए. निवडणुका तीन महिन्यांनी पण होणार नाहीत त्या दिवाळीनंतर होतील, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.