पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात, शरद पवार दिल्लीत; 5 ऑक्टोबर अत्यंत महत्वाचा दिवस
पंतप्रधान मोदी 5 ऑक्टोबरला पुणे दौ-यावर आहेत. लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं मोदी उदघाटन करणार आहेत. मोदींच्या दौ-याकडे शरद पवारांची पाठ फिरवली आहे.
PM Pune visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा पुणे दौ-यावर येणार आहेत. येत्या 5 ऑक्टोबर रोजी पुण्यात मोदींचा दौरा असेल. मोदींच्या हस्ते यावेळी लोहगाव विमानतळावरच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटन करण्यात येईल. मात्र, दोन महिन्यातच मोदी पुन्हा एकदा पुणे दौ-यावर येतायत. त्यामुळे मोदींच्या या दौ-याने राजकीय चर्चांना मात्र उधाण आलंय.पंतप्रधान नरेद्र मोदी पुण्यात असलतील तेव्हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) दिल्लीत असणार आहे.
पंतप्रधान नरेद्र मोदींच्या पुणे दौ-यावेळी शरद पवार पुण्यात नसणार
पंतप्रधान नरेद्र मोदींच्या पुणे दौ-यावेळी शरद पवार पुण्यात नसणार आहेत. पवारांचा नियोजित बैठकांसाठी 5 आणि 6 ऑक्टोबरला दिल्ली दौरा आहे. पंतप्रधान मोदी वेगवेगळ्या विकासकामांसाठी 5 ऑक्टोबरला पुण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचं निमंत्रण पवारांना देण्यात आलं आहे. मात्र पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. टिळक पुरस्कारावेळी पवार आणि मोदी एकत्र आले होते. मात्र यावेळी मोदींच्या दौ-यावेळी पवार उपस्थित नसतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा
मोदी याआधी 1 ऑगस्ट रोजी पुण्यात आले होते.. त्यानंतर मग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसंच भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही पुण्याचा दौरा केला. पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही बैठक झाली होती.. आता पुन्हा मोदी पुण्यात येतायत.. एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रात मिशन 45 आखलंय.. तेव्हा या मिशनमध्ये भाजपने पुण्यावर अधिक लक्ष दिलंय का याचीही चर्चा सुरु झाली.
रवि राणा यांच्या वक्तव्यमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा चर्चेत
येत्या 15 ते 20 दिवसांत राज्यात चमत्कार घडेल आणि शरद पवारांचा सहभाग असणारे मजबूत सरकार राज्यात आणि केंद्रात दिसेल असा खळबळजनक दावा आमदार रवी राणांनी केला होता. रवि राणा यांच्या वक्तव्यमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा चर्चेत आला आहे. रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आमदार मानले जातात. त्यामुळे रवी राणांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. तर, राणांचा हा दावा राष्ट्रवादीच्या पवार गटानं फेटाळून लावलाय.