Trending Video: पांढरा कोब्रा का आहे दुर्मिळ तुम्हाला माहिती आहे का?
King Cobra Video: पांढरा रंग आणि लाल डोळ्यांचा हा कोब्रा इतर सामान्य सापांच्या तुलनेत फारच विषारी असतो आणि तसंच या नागांच्या प्रजातीला एल्बिनो कोब्रा (Albino cobra) असंही म्हणतात.
White Cobra : सोशल मीडियावर (Social media) प्राण्याचे व्हिडीओ (Video) मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. त्या सगळ्यात जास्त सापाचे (Snake) व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. पण जेव्हा साप आपल्या समोर येतो तेव्हा अनेकांना घाम फुटतो. किंग कोब्राचे (King Cobra) अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. नुकताच दुर्मिळ असा पांढऱ्या कोब्रा महाराष्ट्रात (maharastra) आढळला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
व्हिडीओ पाहून तुम्ही व्हाल हैराण
पुण्यात (Pune) भोर मधल्या एका गावात पांढऱ्या कोब्रा आढळल्याने एकच तारांबळ उडाली. या नागाची लांबी जवळपास 4 फूट होती. हा साप आढळल्यानंतर सर्पमित्र पंकज गाडेकर यांनी त्याला पकडलं आणि वनात सोडून दिलं. या कोब्राचा व्हिडीओ व्हायरल (Viral) झाला आहे. (White Cobra snake Trending video Viral on Social media nmp)
पांढरा रंग आणि लाल डोळ्यांचा हा कोब्रा इतर सामान्य सापांच्या तुलनेत फारच विषारी असतो आणि तसंच या नागांच्या प्रजातीला एल्बिनो कोब्रा (Albino cobra) असंही म्हणतात. हा कोब्रा इतर सापांच्या तुलनेत फार वेगात पळतो. एल्बिनोची गणना जगातल्या सर्वात दुर्मिळ अशा 10 प्राण्यांमध्ये केला जातो.
यांचा रंग पांढरा का असतो?
एक्सपर्ट्सनुसार पूर्ण देशात 8 ते 10 पांढरे कोब्रा आढळले आहेत. कोब्रा शक्यतो काळ्या रंगाचे असतात. पण ल्युकेजिम (leukgym) मुळे सापाच्या शरीरात पिगमेंटेशन नाही होत त्यामुळे त्यांचा रंग पांढरा होतो. जगात सध्या किंग कोब्राचे चार प्रजाती आहेत.