कोण आहेत अभिषेक घोसाळकर आणि त्यांचा मॉरीस भाईशी संबध काय?
अभिषेक घोसाळकर आणि त्यांचा मॉरीस भाईंशी संबध काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
Dahisar Firing Abhishek Ghosalkar : मुंबईत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला आहे. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर यांनी एकत्र फेसबुक लाईव्ह केले. यानंतर मॉरिस भाईने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गोळीबारात अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू झाला आहे. तर, मारेकरी मॉरिसची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. कोण आहेत अभिषेक घोसाळकर आणि त्यांचा मॉरीस भाईंशी संबध काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
कोण आहेत अभिषेक घोसाळकर?
अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकरांचे चिरंजीव आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबईतल्या दहीसरच्या कांदरपाडा प्रभागाचे नगरसेवक आहेत. घोसाळकर हे दोन वेळा नगरसेवक होते. ते मुंबै बँकेचे संचालकदेखील आहेत. सध्या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी या नगरसेविका आहेत. बोरीवली मतदार संघात घोसाळकर कुटुंबाचा मोठा राजकीय दबदबा आहे.
कोण आहे मॉरिसभाई?
मॉरिस नरोना ऊर्फ मॉरिस भाई म्हणून ओळखला जातो. मॉरिस भाई बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. एका महिलेची 88 लाखाची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मॉरिस भाईवर आहे. मॉरिस भाईने महिलेला धमकी दिल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. पत्रकारांनाही धमकावल्याचा आरोपही मॉरिस भाईवर आहे. मॉरिस भाईने वॉर्ड नंबर 1 मधून महापालिकेची निवडणूक लढवली होती.
अभिषेक घोसाळकर आणि त्यांचा मॉरीस भाई यांचा संबध काय?
अभिषेक घोसाळकर आणि मॉरीस भाई दोघांमध्ये वैर होते. दोघे एकमेकांचे कट्टर शत्रू होते. राजकीय तसेच मालमत्ता यांचातून त्यांच्यात वाद सुरु होता. काही दिवसपांपूर्वी दोघांनी वैर विसरुन एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी दोघांनी एकत्र फेसबुक लाईव्ह केले. या फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळीबाराचा थरार घडला. यांच्या फेसबुक लाईव्हच्या संवादाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मॉरिसभाईही फेसबुक लाईव्हमधून संवाद साधताना दिसत आहे. या तो म्हणतोय. आपण एकत्र येऊन चांगलं काम केलं पाहिजे, यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, आण्ही साडी, रेशन वाटप करण्याचं ठरवलं आहे. याशिवाय अभिषेकभाई आणि मी नाशिक ट्रिपसाठी बसेस आयोजित करणार आहोत, असं मॉरिसभाई म्हणतोय. फेसबूक लाईव्हमध्ये अभिषेक घोसाळकर मुंबई ते नाशिकआणि नाशिक ते मुंबई बसेस सोडण्याविषयी सांगत होते. तसंच सर्वांनी एकत्र काम करुयात असंही म्हणताना दिसातयत. आयसी कॉलनी, गणपत नगर, कांदळपाडा परिसरात चांगलं काम करायचं आहे. ही सुरुवात आहे, पुढे अजून काम करायचं आहे असंही अभिषेक घोसाळकर म्हणताना दिसतायत. आपलं भाषण संपवून ते तिथू उठले तितक्यात त्यांच्यावर मॉरीसने गोळीबार केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.