पुणे : २० ऑगस्ट २०१३ ला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांचा शोध न लागल्याने सरकार, पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. आज तब्बल ५ वर्षांनी याप्रकरणातील महत्त्वाचा आरोपी सचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे. त्याला उद्या पुण्याच्या कोर्टात केलं जाणार हजर सीबीआयचे हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. सीबीआय आणि एटीएसने संयुक्तरित्याही कारवाई केलीय. 


कोण आहे सचिन अंदुरे ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन अंदुरे हा मूळचा औरंगाबादचा रहाणारा आहे. त्याला औरंगाबादच्या निराला बाजारमधून अटक करण्यात आली आहे. निराला बाजारमध्ये कापडाच्या दुकानात तो अकाऊंटंट म्हणून काम करत होता. त्याचे आई-वडील हयात नसून  पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसोबत तो कुंवारफल्ली येथे राहतो. २० अॅगस्ट २०१३ ला नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली होती .  याप्रकरणी एटीएसच्या ताब्यात असलेल्या तिघांपैकी एकाने हत्येत आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे. अवैध्य शस्त्रसाठ्या प्रकरणी पकडण्यात आलेल्या एका आरोपीचा देखील दाभोळकरांच्या हत्येत हात असल्याची कबूली चौकशी दरम्यान मिळाली आहे. 


एवढ्यावरचं थांबू नये 


२० ऑगस्टला ५ वर्षे पूर्ण होतील. सीबीआयने एवढ्यावर न थांबता खूनाशी संबधित व्यक्तींना ताब्यात घेऊन कारवाई करावी असे हमीद दाभोलकर यांनी म्हटलंय.


कलबुर्गींच्या हत्येची कबुली 


गौरी लंकेश हत्येप्रकरणात १२ जणाना अटक करण्यात आली. त्यामधल्या एकाकडे डायरी मिळून आली. त्यातुन बरच काही तपास यंत्रणेच्या हाती लागल आहे.अटक केलेल्या १२ पैकी एकाने कलबुर्गी यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.