मोहितेंना महाराजांनी दिली होती `हंबीरराव` पदवी, तर मग त्यांचं खरं नाव काय?
छत्रपती शिवाजी महाराजांनी का दिली होती मोहितेंना हंबीरराव ही पदवी?. जाणून घ्या.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचताना अंगावर शहारा उभा राहतो. स्वराज्य उभं करण्यासाठी महाराजांनी ज्या प्रकारे मुघलांना लढा दिला तो इतका सोपा नव्हता. डोंगराएवढं बलाढ्य मुघल सत्तेला खाली आणण्यासाठी महाराजांना अनेक मावळ्यांनी साथ दिली.
महाराजांच्या सोबत अनेक शूर मावळे होते. त्यांच्यापैकीच एक म्हणजे हंबीरराव मोहिते. आज आपण हंबीरराव मोहिते यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी अनेकांना माहित देखील नसेल की, हंबीरराव मोहिते यांचं खरं नाव काय आहे.
स्वराज्याचे संस्थापत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी 'हंबीरराव' ही पदवी मोहिते यांना दिली होती. हंबारराव मोहिते यांचं खरं नाव होतं हंसाजी मोहिते. त्यांच्या कतृत्वाला साजेल अशी पदवी महाराजांनी त्यांना दिली होती.
छत्रपति शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना 1674 मध्ये हंबीरराव ही पदवी देऊन हंसाजी मोहिते यांना त्यांच्या सेनेचे प्रमुख सेनापती बनवले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकानंतर हंबीरराव मोहिते (Hambirrao Mohite) ते त्यांचे प्रमुख सेनापती होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी होत्या. हंबीरराव यांची कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या.
आदिलशाहचा सरदार बहलोलखान याच्या विरुद्ध सुरु असलेल्या लढाईत सेनापती प्रतापराव गुजर पडले. हा माहिती मिळताच प्रतापरावांच्या फौजेत असलेले हंबीरराव मोहिते यांनी पुन्हा सर्व सैनिकांमध्ये हिंमत जागृत केली आणि बहलोलखानवर आक्रमण करत त्य़ाच्या सैन्याला विजापूरपर्यंत पिटाळून लावले.
हंबीरराव मोहिते (Sarsenapati Hambirrao) यांच्या जीवनावर आता चित्रपट ही येत आहे. या चित्रपटात प्रविण तरडे यांनी त्यांची भूमिका साकारली असून या चित्रपटाची बरीच चर्चा आहे.