अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक पक्ष अपक्ष आमदार आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेले आमदार रवी राणा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने अपक्ष आमदारांना सांभाळले त्यातील एक इंचसुद्धा उद्धव ठाकरे सांभाळू शकले नाही. काही अपक्ष आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा रवी राणा यांनी केला. 


राज्यसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येईल. मतदानाच्या वेळेस अपक्षांच्या माध्यमातून मोठा भूकंप महाविकास आघाडी सरकारला दिसेल असा गौप्यस्फोट आमदार रवी राणा यांनी केला आहे. 


आमदार रवी राणा यांच्या संपर्कात असणारे ते अपक्ष आमदार कोण असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे