रायगड : रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेत धुसफूस सुरू आहे. मंगळवारी रोहा येथे झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री पदाबाबत तडजोड नाही, अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली. ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा पालकमंत्री, असा फॉर्म्युला अजित पवार यांनीच सांगितला होता मग रायगडमध्ये आमचे ३ आमदार असताना आमचा पालकमंत्री का नको? असा सवाल उपस्थित करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या भावना येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून त्यांच्या कानावर घालण्यात येतील, असे आमदार भरत गोगावले यांनी सांगितलंय. 


दरम्यान, बुधवारी जिल्हा परिषद सभापती पदाची निवडणूक होत आहे. यावेळी सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णयदेखील या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते.