कोण होणार संघाचे सहाकार्यवाह?
९ ते ११ मार्च दरम्यान होणा-या अखिल प्रतिनिधी सभेसाठी संघ परिवारातल्या संघटनातील प्रमुख प्रतिनिधी नागपुरात दाखल होत आहेत.
नागपूर : ९ ते ११ मार्च दरम्यान होणा-या अखिल प्रतिनिधी सभेसाठी संघ परिवारातल्या संघटनातील प्रमुख प्रतिनिधी नागपुरात दाखल होत आहेत. रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात होणा-या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत आणि संघाच्या वरिष्ठ पदाधिका-यांचं बैठकीचं सत्र याआधीच सुरू झालंय. नागपुरात होत असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधीसभेत सरकार्यवाहपदाची कुणाची निवड होणार याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.