रतन टाटांचा तो खास मित्र कोण? ज्याला समुद्र किनाऱ्याच्या बंगल्यासह दिल्या तीन खास गोष्टी
Ratan Tata: रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचं काय? असा प्रश्न चर्चेत होता.
Ratan Tata: रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे असलेल्या कोट्यवधी संपत्तीचे काय होणार हा प्रश्न चर्चिला जात होता. रतन टाटांनी त्यांच्या अर्ध्याहून अर्धी संपत्ती ट्रस्टकडे सोपवली आहे. तर, रतन टाटा यांच्या प्रिय वस्तु कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू आहे. रतन टाटा यांच्या प्रिय संपत्तींमध्ये एक पिस्तूल, बंदूक आणि रायफल यांचा समावेश आहे. या वस्तु त्यांनी कोणाला दिल्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या सर्वात प्रिय संपत्तीचे मालकी हक्क मेहली मिस्त्री यांना दिली आहे.
एका रिपोर्टनुसार, या तीन वस्तु रतन टाटा यांना भेटवस्तू म्हणून मिळाल्या होत्या. या तिन्हींपैकी एक सुमंत मुलगावकर यांनी रतन टाटा यांना भेट म्हणून दिली होती. ते 1988 मध्ये टाटा मोटर्सचे अध्यक्ष होते. सुमंत यांना शिकारीची खूप हौस होती. पण तेव्हा वन्यजीव संरक्षण नियम लागू झाला नव्हता. या व्यतिरिक्त रतन टाटा यांना मिळालेल्या दोन्ही भेटवस्तु यांना वारसा म्हणून मिळाल्या होता. एक त्यांचे वडिल नवल टाटा आणि दुसरी जेआरडी टाटा यांनी त्यांना भेट म्हणून दिली होती.
रतन टाटा यांच्या निधनानंतर ही हत्यारं पोलिस शस्त्रागरात सोपवण्यात आली होती. आता ही हत्यारे मिळवण्यासाठी मिस्त्री यांना स्वरक्षण, खेळासाठी किंवा सजावटी या उद्देशांचा हवाला देऊन लायसन्स मिळवावे लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर त्यांच्याकडे आधीपासूनच कोणते हत्यार असेल तर त्याअंतर्गंतही ते नोंदणी करू शकतात. मात्र, मेस्त्री सजावटीच्या उद्देशाने ही हत्यारे मिळवती, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या हत्यांराव्यतिरिक्त टाटांची अलिबाग येथील एक संपत्ती मिस्त्रींच्या नावावर करण्यात आली आहे. अलिबाग येथील समुद्र किनारी टाटांचा एक बंगला आहे. मेहली मेस्त्री आणि रतन टाटा हे दोघे घनिष्ठ मित्र होते. 2012मध्ये टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन सेवानिवृत्त झाल्यानंतर टाटा कुलाब्यातील तीन मजली बंगल्यात राहत होते. मेहली मिस्त्री हे टाटा सन्सचे माजी चेअरमन असलेल्या सायरस मिस्त्री यांचे चुलत बंधु आहेत. 2000 सालापासून ते टाटांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत. 2022मध्ये त्यांच्यावर सर रतन टाटा ट्रस्ट आणि दोराबजी टाटा ट्रस्टच्या बोर्डवर सामील करुन घेण्यात आलं होतं.