माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा : भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकीकडे काँग्रेसमधून नाना पटोलेंच्या नावाची चर्चाय. तर कुणबी समाजाकडे उमेदवारी दिल्यास भाजपाच्या विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाणार. त्यात राष्ट्रवादीतून भाजपात आलेले अविनाश ब्राम्हणकरही उमेदवारीसाठी इच्छुक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील साकोली-लाखांदूर मतदारसंघातील हलचाली वाढल्या आहेत. काँग्रेसमधून सध्या नाना पटोले यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. नाना पटोले कुणबी समाजाचे असल्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार राजेश काशिवार यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. त्याऐवजी कुणबी समाजाच्या उमेदवारांना संधी मिळू शकते. या शर्यतीत भाजपातून एकूण 21 जण इच्छुक असून, यातले प्रमुख दावेदार जिल्हाध्यक्ष वामनराव बेदरे आणि नुकतेच राष्ट्रवादीतून आलेले अविनाश ब्राम्हणकर मानले जात आहेत. 


ब्राम्हणकरांनी नुकताच भाजपात प्रवेश केलाय. त्यामुळे मुळ भाजपावासी कार्यकर्त्यांची त्यांनी कितपत पसंती मिळते याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तर गेल्या निवडणुकीत लाखांदुर तालुक्यातून मताधिक्य मिळाल्यामुळे साकोलीतील विद्यमान आमदार राजेश काशिवार यांना उमेदवारी मिळाल्यास राजेश पेक्षा नाना बरा. असा सूर आळवण्यात येतो आहे.