महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! 2019 मध्ये भाजप शक्तीशाली पक्ष असतानाही शिंदे आणि अजित पवारांना सोबत का घ्यावे लागले?
Maharashtra Politictics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संघ परिवाराची महत्वाची बैठक पार पडली. संघाच्या या बैठकीत पुन्हा अजितदादांवर मंथन झालंय.
devendra fadnavis : नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत पुन्हा मुद्दा आला तो अजित पवारांचाच.. विधानसभेच्या निवडणुकीआधी संघाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले होते.. या बैठकीतही अजित पवारांना महायुतीत घेण्यावरुन मंथन झाल्याचं समजतंय. महायुतीत अजित पवारांची गरज का आहे ? हे फडणवीस यांनी संघाला पटवून दिल्याची माहिती मिळतेय..
संघाच्या बैठकीत फडणवीस काय म्हणाले?
2019 साली भाजप मोठा पक्ष असतानाही एकट्या भाजपच्या मतांच्या टक्केवारीवर भाजप स्वबळावर सत्तेवर येऊ शकेल अशी स्थिती नव्हती
आधी शिंदेंना सोबत घेण्यात आलं. तरी दोघांची मतांची टक्केवारी लोकसभा निवडणुकीत आणि पुढे विधानसभा निवडणुकीत आधीसारखं यश मिळवून देईल अशी नव्हती. त्यामुळे अजित पवारांनाही सोबत घेतलं.
भाजपच्या अनेक कोअर वोटरला तसेच संघ परिवारातील अनेकांना अजित पवार यांना सोबत घेणे रुचलं नसलं तरी राजकीय परिस्थितीचा वास्तव पाहून त्यांना सोबत घेण्यात आलं.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की अजित पवार यांना सोबत घेतल्याचा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपला फार फायदा झालेला नाही.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र भाजपमधील सर्वप्रमुख नेत्यांनी बसून परिस्थितीचा आकलन केले
मात्र त्यातही विधानसभा निवडणुकीत अजितदादांना सोबत घेऊनच महायुती म्हणून पुढे जावे असे ठरले
भाजपने निवडणुकीची लांबलचक यंत्रणा उभी केली होती.. मात्र या यंत्रणेत महत्त्वाच्या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश नसल्यामुळे भाजपला फारसा फायदा झालेला नाही
लोकसभा निवडणुकीच्या अनुभवातून हे लक्षात आलंय की सध्याच्या काळात उमेदवार निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे
भाजपचे जेवढे ही खासदार जिंकून आले त्यापैकी गडकरी, रक्षा खडसे सोडून इतर सर्व नवे उमेदवार होते
ज्या ठिकाणी उमेदवार बदलले गेले नाही आणि जुन्या उमेदवारांना संधी दिली ते पराभूत झाले.
म्हणून शिंदे, अजितदादांना सोबत घेतलं'
लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि भाजप यांच्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी मतांचं ट्रान्सफर झाल्याचा दावा बैठकीत करण्यात आल्याचं समजतंय. महायुतीत अजित पवारांना घेऊन नुकसानच झालंय अशी चर्चा संघाच्या अंतर्गत बैठकीत झालीय. अजित पवारांना महायुतीत घेतल्यानं संघ परिवार नाराज आहे.. संघाचं मुखपत्र ऑर्गनायझर तसंच संघाशी संबंधित विवेक साप्ताहिकातूनही अजित पवारांवरुन खडेबोल सुनावण्यात आले होते.