Land Measurement units : एखादं शेत (Farm Land) किंवा एखादा भूखंड ज्यावेळी मोजला जातो तेव्हा त्यासाठी काही परिमाणं वापरली जातात. गुंठा (Guntha), एकर (Acre), हेक्टर (Hector) अशी परिमाणं वापरली जातात. पण, यापुढे जमिनीची मोजणी चौरस फुटांमध्ये (square feets) होते. सर्वसाधारणपणे जमिनिच्या मोजणीची सुरुवात अनेक ठिकाणी गुंठ्यांमध्ये गेली जाते. किंबहुना याच परिमाणाच्या आधारे जमिनीचे मोठमेठो व्यवहार केले जातात. सहसा 1 हजार चौरस फूटांचं भूक्षेत्र म्हणजे 1 गुंठा हे माप अंदाजात घेतलं जातं. (why do we use gunthe to measure land read interesting story and fact )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतके इतके गुंठे म्हणजे एक एकर, एक एकर म्हणजे किती हेक्टर? असे प्रश्नही या आकडेवारीवेळी अनेकांना पडतात. पण, आकडेमोडीच्या नावानं बोंब असणाऱ्यांचा मात्र इथं चांगलाच गोंधळ उडतो. जमिनीच्या मोजणीसाठीची ही परिमाणं तुमच्या लक्षात राहत नाहीयेत? हरकत नाही. पण, त्यातील एका परिमाणाचा वापर नेमका कसा सुरु झाला यामागची कहाणी मात्र तुम्हाला माहित असायला हवी. कारण, ती कहाणी आहेतच तितकी रंजक. 


हेसुद्धा पाहा : Niagara Falls Frozen : नायगरा धबधबा गोठला; खळाळून वाहणारं पाणी अधांतरी थांबलेलं कधी पाहिलंय का?


सोशल मीडियावरील एका व्लॉगमधून (You tube vlog) ही कहाणी सर्वांपर्यंत पोहोचली. यावेळी उदाहरण देण्यासाठी समोर कोकण आणि कोल्हापूर (kolhapur) या पट्ट्यांना जोडणारं विस्तीर्ण अंबा क्षेत्र होतं. 


... आणि उदयास आला 'गुंठा'


सामान्य माहितीप्रमाणं 30× 33 या मापाची जागा म्हणजे गुंठा. तुम्हाला माहितीये का, जमिनीची मोजणी गुंठ्यांमध्ये होण्याआधी ती बिघा या परिमाणामध्ये मोजली जात होती. पण, त्यानंतर गुंठेल नावाच्या एका अधिकाऱ्यानं जमिनीच्या मोजणीसाठी 30×33 च्या सर्वसमावेशक प्रमाणावर शिक्कामोर्तब केलं.  


ज्या इंग्रज अधिकाऱ्यानं (british officer) या प्रमाण परिमाणाची आकडेवारी निश्चित केली, त्याचं नाव गुंठेल. म्हणूनच असं म्हटलं जातं की या अधिकाऱ्याच्या नावावरूनच ते परिमाणही 'गुंठा' म्हणून वापरात आलं. गुंठेलनं 1842 मध्ये जमीन मोजणीस सुरुवात केली आणि तिथपासून महाराष्ट्रात गुंठ्यामध्ये जमीन मोजणीला प्रारंभ झाला. 


आरशांच्या वापरानं मोजली जायची जमीन (land Measurement using mirror)


सध्या भूखंड मोजणीसाठी अत्याधुनिक यंत्र, उपकरणं आणि तंत्रांचा वापर केला जातो. पण, कैक वर्षांपूर्वी हीच मोजणी आरशाच्या मदतीनं केली जात होती. सूर्यप्रकाश आणि आरशातून येणारं प्रतिबिंब हे या मोजणीतील महत्त्वाचे घटक होते. याच धर्तीवर राज्यातील जिल्ह्यांची हद्द ठरवण्यात आली होती. स्थानिक जाणकारांच्या मते सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागांच्या हद्दी इथूनच आखल्या गेल्या होत्या. 


याच परिमाणाच्या आधारे महाराष्ट्राच्या मोजणीला 1842 मध्ये इंग्रजांकडून सुरुवात करण्यात आली होती. तेव्हापासूनच गुंठा हा श्बद वापरात आला आणि पुढे तो प्रचलित झाला. नकळतपणे आजही हा शब्द जमीन, भूखंडांच्या व्यवहारांमध्ये वापरला जातो किंबहुना यापुढेही वापरला जाईल. पण, या शब्दाच्या जन्माची कहाणी आहे ना रंजक?