24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना 100 टक्के आरक्षण मिळणारच; मनोज जरांगे पहिल्यांदाच इतके ठाम का?
24 डिसेंबरच्या आत सरकार मराठा समाजला आरक्षण देईल असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. जरांगे पहिल्यांदाच इतके ठामपणे बोलले आहेत.
Manoj Jarange Patil on Maratha Reservation : राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अंतिम आणि निर्णायक टप्प्यावर आल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरील निवेदन सादर केले. कुणबी नोंदी सापडलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणारच असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. सभागृहात मुख्यमंत्री शिंदे यांनी मांडलेल्या मराठा निवेदनानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ठामपणे सकारात्मक भूमिका मांडली आहे. 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना 100 टक्के आरक्षण मिळणारच अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली आहे.
1967 पूर्वीच्या जुन्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना ओबीसी प्रमाणपत्रे मिळतील असे अश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. रक्ताचे नाते असणाऱ्याना लाभ देणार हा उल्लेख महत्वाचा. यामुळे सरकार निश्चित मराठ्यांना आरक्षण देईल मात्र, 24 डिसेंबरच्या आत सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
शिंदे समितीच्या संशोधनात कुणबी नोंदी आढळलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणारच अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केलेल्या निवेदनात दिलीय. राज्य मागसवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा आरक्षणावर फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. फेब्रुवारीत अहवाल येणार की नाही हे आम्हाला माहीत नाही. हे टिकेल की नाही यात शंका आहे. 24 डिसेंबर पर्यंत आम्हाला आरक्षण द्या नाहीतर आंदोलन करणार असे जरांगे म्हणाले.
सरकारने भूमिका स्पष्ट करावी
67 चे पुरावे सापडले त्यातून रक्ताच्या नात्यांना प्रमाणपत्र देणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी जरांगे यांनी केली. 1967 च्या आधीपासूनच्या नोंदी सापडल्या त्याचा लाभ कसा देणार. यासाठी कोणत्या अटी ठेवणार. त्यासाठी कायदा करायचा असेल तर तो 24 डिसेंबरच्या आधी करावा. याला मागासवर्ग आयोगाचा फक्त आदेश लागेल. अहवालाची गरज नाही. 1967 आधीपासूनच्या नोंद लागतील. त्यासाठी सकाळपर्यंत आदेश मिळवा. रक्ताच नात कसं गृहीत धरणार याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी. 24 डिसेंबरच्या आत सरकार मराठा समाजला आरक्षण देईल असा विश्वास जरांगे यांनी स्पष्ट केला आहे.