नागपूर : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या  घराबाहेरील स्फोटकप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. काल मुंबईचे माजी पोलीसआयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रातून गंभीर आरोप गृहमंत्र्यावर केले आहे. या पत्राबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गप्प का असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.



देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार  परिषदेत मांडलेले मुद्दे


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    पोलीस  महासंचालक सुबोध जैयस्वाल यांनीही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत होणाऱ्या घोडेबाजारावर अहवाल राज्य सरकारला दिला होता. 

  • महाराष्ट्रातील पोलीस महासंचालक पद हे देशातील महत्वाचं पद होय. सुबोध जैयस्वाल यांनी उघडकीस आणलेल्या पोलीसांच्या बदल्यांचे रॅ्केटचे मुख्यंत्र्यांनी चौकशी केली नाही. 

  • वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या चौकशीत बदल्यांच्या रॅकेटबाबत दिलेल्या अहवालात धक्कादायक गोष्टी पुढे आल्या होत्या.  त्या अहवालात ज्या अधिकाऱ्यांची नावे आली होती. त्यांना पु्न्हा त्याच ठिकाणी बदल्या देण्यात आल्या आहेत.

  • शरद पवार साहेब म्हणतात, परमबीर सिंह यांची बदली केल्याने त्यांनी आरोप केले असावेत. तर मग माझा प्रश्न आहे की, सुबोध जैयस्वाल यांची कुठे बदली झाली होती. त्यांनीही पोलीस विभागावर मोठे आरोप केले आहेत. त्याचे काय झाले?

  • परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेतले तर, सरकार झोपले होते का?  मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या आशिर्वादानेच सचिन वाझे यांना महत्वाच्या केसेस देण्यात आले. 

  • शरद पवार यांनी जुलेओ रुबेलो (Julio Ribeiro) यांनी याबाबत चौकशी करावी असे म्हटले आहे. जुलेओ रुबेलो हे अनेक वर्षापूर्वी निवृत्त झालेले महासंचालक आहेत. त्यामुळे ते याबाबतची चौकशी करू शकतात का? हा प्रश्नच आहे..

  • परमबीर सिंह यांनी लिहलेलं पत्राबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का बोलत नाहीयेत? त्यांनी पत्रात व्हाट्सअप चॅटचा दिलेला पुरावा हा बदलीच्या आधीचा पुरावा आहे. त्यामुळे त्याकडे दूर्लक्ष करणे. हे आरोपीच्या पापावर पांघरून घालण्यासारखे आहे.

  • नक्की गृहमंत्रालय कोण चालवतं हे कळत नाहीये, विधिमंडळात गृहखात्याच्या प्रश्नांना शिवसेनेचे अनिल परब उत्तरे का देतात? हे कळत नाही.

  • सचिन वाझेकडे मिळालेल्या गाड्या, गेल्या 5-6 महिण्यात कोण कोण वापरत होतं. याबाबत यंत्रणांनी तपास करावा.

  • महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणाऱ्या घटनेची निपक्ष चौकशीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही.


  •