सोलापूर :  ही बातमी आहे नवऱ्याच्या निर्दयीपणाची. हे दाम्पत्य आहे सोलापुरातील. या दाम्पत्यातील नवऱ्याने चक्क आपल्या पत्नीच्या डोक्यावरचे लांबसडक केस कात्रीने कापून टाकले. हे कृत्य त्याने कोणत्याही फॅशनचे अनुकरण म्हणून नव्हे तर, चक्क संतापातून केले. या संतापाचे कारण तरी काय? तर म्हणे बायकोने भाजीत मीठ जास्त टाकले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विचित्र आणि तितक्याच विक्षिप्त नवऱ्याविरोधात पीडित पत्नी रूकसाना हिनं पोलिसात तक्रार दिली आहे. असिफ शेख असे या पतीचे नाव आहे. रुकसानानं पालकची भाजी केली होती. मात्र जेवताना असिफला मीठ जास्त लागले. त्यामुळे तो संतापला आणि त्यानं रुकसानाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच तो थांबला नाही. तर असिफनं निर्दयीपणे कात्रीनं रुकसानाचे लांबलच्चक केस कापले. 


 


प्राप्त माहितीनुसार, रूकसाना हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी असिफ शेख हिच्यासोबत झाला. तिला तीन वर्षांचा मुलगा आहे. पती आसीफ शेख हा बेकार असून तो काहीच कामधंदा करीत नाही. रूकसाना हीच शेतमजुरी करून घराचा संसार चालविते. ती कामाला गेली नाही तर तो तिला त्रास देतो, असे रूकसानाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी पीडित रूकसाना यांच्यावर घडलेला अत्याचार ऐकून तिच्या पतीविरूध्द तक्रार नोंदवून घेतली.