चैत्राली राजापूरकर, झी मीडिया,


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Pune Crime News: मावळमधील जावयाच्या हत्या प्रकरणाने वेगळं वळण घेतलंय. पत्नीनेच पतीच्या (Wife Killed Husband) हत्येचा बनाव रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. (Husband Killed By Wife In Pune)


दीड महिन्यांपूर्वी झाला होता विवाह


सूरज काळभोर असं हत्या झालेल्या जावयाचे नाव असून आरोपी पत्नीचे नाव अंकिता काळभोर असं आहे. तळेगाव पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. सूरज आणि अंकिता यांचा दीड महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर सूरज काळभोर त्यांच्या पत्नीसह सासरी आले होते. रविवारी सकाळी शेतात फिरायला गेले असता त्यांची हत्या करण्यात आली. 


अन् पत्नीचे बिंग फुटले


घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी हा प्रकार लूटमार करण्याच्या उद्देशाने करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. तसंच, पत्नीचा जबाब नोंदलवल्यानंतर तिने चार ते पाच अज्ञातांनी पतीची हत्या केल्याचे सांगितले. मात्र तिने सांगितलेल्या घटनाक्रमावर पोलिसांना संशय आला. त्यानंतर त्यांनी उलट तपासणी करण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांची समाधानकारक उत्तरे ती देऊ शकली नाही, अखेर पोलिसांसमोर तिचे बिंग फुटले. तळेगाव पोलिसांनी तिला अटक केलेली आहे. 


म्हणून पतीला जीवे मारण्याचा कट रचला


पती सूरज काळभोर हा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा. सूरज काळभोरने पत्नी अंकिता काळभोरचा शारीरिक छळ केला. त्यामुळं ती त्याच्यावर चांगलीच संतापली होती. त्याच्या रोजच्या त्रासाला कंटाळून तीने पतीला संपवायचं ठरवलं. यासाठी रविवारी सकाळी अंकिताने पतीला माहेरी म्हणजे गहूंजेला न्यायचं ठरवलं. पतीला मारायच्या उद्देशाने तिने आधीच घरातील चाकू सोबत घेतला होता. 


शेतात घेऊन गेली अन् संपवले पतीला 


पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीतील सुरजच्या घरातून ते सकाळी निघाले. तिथून दोघांनी प्रति शिर्डीत साई बाबांचं दर्शन घेतलं. मग दुपारी गहूंजेतील घरी जायच्या आधी तेथीलचं शेतात पोहचले. तिथं पोहचल्यावर अंकिताने लघुशंकेला जायचा बहाणा केला. थोडं नजरेआड जाऊन तिने पतीवर नजर ठेवली. पती बेसावध असल्याची खात्री केली अन सोबत आणलेला चाकू बाहेर काढला. दबक्या पावलाने पती जवळ जाऊन तिने मागून चाकूने गळा चिरला आणि जमिनीवर ढकलून दिले. त्यानंतर शेतातील टिकाव आणि दगड डोक्यात घातला. यात पतीचा जागीच मृत्यू झाला.