Devendra Fadnavis And Uddhav Thackeray :  राजकारणात कधी ही काहीही होऊ शकतं अशाच प्रकारच्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात पहायला मिळत आहे. सध्या एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे भाजप - ठाकरे पुन्हा एकत्र येणार असा चर्चा रंगल्या आहेत. या कारण आहेत ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis). शत्रुत्वाची भावना संपवण्याची गरज असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यानंतर ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया यामुळे यांच्यातीव वाद मिटणार असे बोलले जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील भाजप - ठाकरे युतीबाबत मोठं वक्तव्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज भी अच्छे रिलेशन है... हमारे मन में कटुता नही... मेरा दिल साफ है...  उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. महाराष्ट्राच्या उद्धव आणि आदित्य ठाकरे माझे शत्रू नाहीत. राजकारणात अलिकडे शत्रुत्वाची भावना निर्माण झाली असून ती संपवण्याची गरज असल्याचे मत फडणवीसांनी व्यक्त केले. यानंतर आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत. त्यांच्याशी केवळ वैचारिक मतभेद आहेत असं वक्तव्य माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते. 
सध्या ठाकरे आणि भाजपमध्ये 36 चा आकडा आहे असंच म्हणावं लागले. ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील हा संवाद पाहता  ठाकरे विरुद्ध फडणवीस संघर्ष लवकरच संपेल अशी चर्चा रंगलेय. ठाकरे आणि भाजपमध्ये पुन्हा युती होऊ शकते. 


संजय राऊत यांची रोखठोक भूमिका


पॅचअपबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. ठाकरेंनी यावर ना सकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि ना नकारात्म....मात्र त्यांचे फायरब्रँड प्रवक्ते संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे एक घाव दोन तुकडे अशी भूमिका घेत माफ करायचं की नाही हे आम्ही ठरवू आणि भाजपनं जो गुन्हा केलाय त्यासाठी माफी नसल्याची रोखठोक भूमिका मांडली आहे. 


भाजपला माफ करायचे की नाही हे जनता ठरवेल असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणालेत. शिवसेना फोडून भाजपनं मोठा गुन्हा केला आहे. राज्याची जनता या वेदना कधीही विसरणार नाही. हा महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला 'बाण' असल्याचे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे.  राजकारणामध्ये मतभेद होत असतात. काही वेळेला टोकाचे मतभेदही होतात. यापूर्वी अनेक पक्षातही मतभेद झालेत. पण, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला पक्ष फोडता आणि चोर आणि लफंगांच्या हातावर ठेवता, कोण तुम्हाला माफ करेल असेही संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारा पक्ष केंद्रीय तपास यंत्रणा आणि पैशाचा वापर करुन भाजपने फोडला आहे.  हा महाराष्ट्र राज्यावर केलेला आघात असल्याचे राऊत म्हणाले. 


भाजप नेत्यांची ठाकरेंना साद


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील ठाकरेंना साद घालण्याटा प्रयत्न केला.  आपले मनभेद आणि मतभेद दूर करून हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे कसा जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श घेऊन कसे हे राज्य पुढे नेता येईल, यासाठी प्रयत्न करावे अशी विरोधकांनासुद्धा विनंती करतो. यावेळी त्यांनी थेट  संजय राऊत यांचे नाव घेतले होते.  मनभेद आणि मतभेद विसरून महाराष्ट्रासाठी एकत्रितपणे काम करावे. आमची नेहमीच त्यांना साथ राहिल असे बावनकुळे म्हणाले होते.