Jayant Patil :  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते  (Sharad Pawar Group)  आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)  हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.  काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan)  यांच्या भाजप प्रवेशानंतर जयंत पाटील देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. जयंत पाटील यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात  सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत खुलासा केला आहे. 


जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपप्रवेशाबाबत केवळ अफवा आहेत. आमच्यातलं कुणीही भाजपात जाणार नाही असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलंय. चर्चा होतच असते, ती होऊ द्या असंही त्यांनी म्हंटलंय. पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागल्याचं बोललं जातंय. त्यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय.  मी पक्ष प्रवेश सोडणार बातमया कोठून येतात मला माहिती नाही. भाजपा कडून मला कोणतीही ऑफर आलेली नाही. आमचे लोक कुठेही जाणार नाहीत. मी दिल्लीला गेलो नाही. त्यामुळे बैठक दिल्लीत भाजपा नेते सोबत होण्याचे कारण नाही.  मी 15 वर्ष कॅबिनेट राहिलो मला मंत्री पद हे प्रलोभन होऊ शकत नाही असा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे. राजकारणात मोठा भूकंप होईल असे विधान अजित पवार गटाचे नेते  सुनिल तटकरे यांनी केले होते. यावर देखील जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  भूकंप होणार असे ते म्हणतात मग कोण कोण हे तटकरे यांना विचारावे , भूकंप होईल इतका मी मोठा नाही असं जयंत पाटील म्हणाले.  


लोकसभा जागांबाबत महाविकास आघाडीत चर्चा  सुरू आहे. पुढील सात आठ दिवसात जागावाटपाचा विषय संपवला जाईल.  रावेर लोकसभा जागा आम्ही लढवणार आहोत.  प्रकृतीमुळे ते निवडणूक लढवणार नाही असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. खडसे यांच्यासोबत बोलून उमेदवार जाहीर करु.  राजू शेट्टी यांनी आमच्या सोबत चर्चा केली नाही. ठाकरे सोबत त्यांची चर्चा झाली असेही जयंत यांनी जागावाटपाबाबत बोलताना स्पष्ट केले. 


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपच्या वाटेवर


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याला कारण ठरलंय ते आमदार नितेश राणेंचं एक विधान. अकोल्यात नितेश राणेंच्या सभेनंतर वडेट्टीवारांनी टीका केली होती. त्यावर नितेश राणेंनी लवकरच तुमचा आणि आमचा बॉस एकच असेल असं ट्विट केलं. सोबत वडेट्टीवार ओरिजिनल हिंदुत्ववादी आहेत असंही नितेश राणेंनी म्हटलंय. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.