वाल्मिकी जोशी, जळगाव, झी मीडिया Maharashtra Politics News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)  यांच्यासह शिंदे गटातील मंत्री व आमदार यांची 21 तारखेला गुवाहाटीला (Guwahati) कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा आहे मात्र 21 नोव्हेंबर ऐवजी लवकरच नवीन तारीख जाहीर होणार नवीन तारीख आल्यावर गुवाहाटी ला जाण्याबाबत निर्णय होईल  पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री असं गुलाबराव पाटील (Gulab Raghunath Patil) यांनी म्हंटले आहे. (will the cm eknath shinde group go to guwahati Big update given by gulabrao patil nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या अडावद येथे जलजीवन मिशन योजनेतून 36 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून या योजनेचे भूमिपूजन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी गुलाबराव पाटील यांचा आमदार लता सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.



या काळात चांगली कामे होत असल्याने राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला असावा. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श असून यावेळी जी कामे होत आहे ती चांगल्या पद्धतीने नितीन गडकरी करत असल्याचे राज्यपालांनी त्या भावनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला असावा अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.


हे ही वाचा - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद सोडवणार उच्चस्तरीय समिती; 14 सदस्यांचा समावेश


 



जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील दापोरा येथे 16 कोटी रुपयांच्या विकास कामांचे तर चोपडा तालुक्यातील अडावद येथे 36 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे शनिवारी भूमिपूजन केले दरम्यान एका दिवसात 51 कोटी रुपयांचे भूमिपूजन करणारा मी पाहिला मंत्री असल्याचे म्हंटले आहे. आम्ही कधी स्वप्नही पाहिले नव्हते की आमदार मंत्री होऊ मात्र तरीदेखील विरोधक आम्हाला बदनाम करतात आहेत.


 




बदनाम तो वो होते है जो बदनामी से डरते है . हम तो है जिसे बदनामी डरती है अशा आपल्या खास अंदाज मध्ये गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे तर आम्ही मुसलमानांच्या विरोधात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत मात्र विरोधकांच्या या आरोपालाही गुलाबराव पाटलांनी आपल्या खास शायरीत उत्तर दिले आहे.