पैठण : औरंगबादच्या पैठण तालुक्यात थेरगावमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे ५०  घरांचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे  डाळिंब आणि मोसंबीच्या बागा त्यामुळं उद्धवस्त झाल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वादळी पावसामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले आहेत, तर काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. यात अनेक झाडंही उन्मळून पडली आहेत तर विजेचे खांबही सुद्धा कोसळले आहेत. शनिवारी संध्याकाळी सोसाट्याचा वारा आला आणि गावांत हाहाकार उडाला. 


प्रशासनाकडून सकाळपासून पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. खरं तर मान्सूनचा तसा पहिला पाऊस आनंद देणारा असतो, मात्र या गावांत पहिल्या पावसानं ग्रामस्थांची पुरती दाणादाण उडवली आहे. 


पैठण तालुक्यातल्या थेर गावांत आलेल्या वादळी पावसानं फळबागांचं मोठं नुकसान झालंय. डाळिंब आणि मोसंबीच्या बागा त्यामुळं उद्धवस्त झाल्यात. भर उन्हात टँकरनं पाणी आणून शेतक-यानं या बागा जगवल्या. पण आता हाता तोंडाशी आलेलं फळ पावसानं मात्र हिरावून नेले आहे.